India VS Bangladesh 1st Test 2nd Day : चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर सुरु असलेल्या भारत विरुद्ध बांगलादेश टेस्ट सीरिजच्या पहिल्या सामन्याचा दुसरा दिवस शुक्रवारी पार पडला. दुसऱ्या दिवशी सुरुवातीला टीम इंडियाच्या 10 विकेट्स घेऊन बांगलादेशने त्यांना 376 धावांवर रोखले. त्यानंतर टीम इंडियाच्या घातक गोलंदाजी समोर बांगलादेश केवळ 149 धावाच करू शकली. अखेर दुसऱ्या दिवसाअंती टीम इंडियाने पुन्हा फलंदाजी करताना 308 धावांची आघाडी घेतली आहे.
Boom Boom Bumrah
Cleans up Shadman Islam with a peach of a delivery.
Live - https://t.co/jV4wK7BgV2… #INDvBAN@IDFCFIRSTBank | @Jaspritbumrah93 pic.twitter.com/RYi9AX30eA
— BCCI (@BCCI) September 20, 2024
टीम इंडियाचा प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराहने (Jasprit Bumrah) बांगलादेश विरुद्ध टेस्ट सामन्याच्या दुसऱ्या दिवशी इतिहास रचला. बुमराहने बांगलादेशविरुद्ध तब्बल 4 विकेट घेतल्या. यासह बुमराहने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 400 विकेटचा टप्पा पूर्ण केला आहे. अशी कामगिरी करणारा तो दहावा भारतीय गोलंदाज ठरला.
What a sight for a fast bowler!
Akash Deep rattles stumps twice, giving #TeamIndia a great start into the second innings.
Watch the two wickets here #INDvBAN IDFCFIRSTBank pic.twitter.com/TR8VznWlKU
— BCCI (BCCI) September 20, 2024
बांगलादेश विरुद्ध टीम इंडियाच्या जवळपास सर्वच गोलंदाजांनी चांगले प्रदर्शन केले. यात आकाश दीपने नवव्या ओव्हरच्या पहिल्या दोन बॉलवर बांगलादेशच्या दोन विकेट्स घेतल्या. यात आकाशने झाकीर हसन आणि मोमिनुल हक याला बोल्ड आउट केले. झाकीरला आकाशने टाकलेला बॉलचा वेग इतका जास्त होता की बॉल स्टंपवर आदळल्याने मिडल स्टंप तुटला. रवींद्र जडेजाने देखील 8 ओव्हर टाकून केवळ 19 धावा देऊन 2 विकेट्स घेतल्या.
हेही वाचा : तिथं आकाश वेदनेनं कळवळत असताना, विराटने मारला जोक, गंभीर सुद्धा दिलखुलासपणे हसला
रोहित शर्माने बांगलादेश विरुद्ध टेस्ट सामन्यापूर्वी 2024 या वर्षात आतापर्यंत खेळलेल्या 25 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये एकूण 990 धावांची कामगिरी केली होती. तर त्याच्या तुलनेत इतर संघांच्या कर्णधारांना 600 धावांचा टप्पा सुद्धा गाठता आला नव्हता. बांगलादेश विरुद्ध टेस्ट सामन्यात रोहितच्या बॅटमधून समाधानकारक धावा निघाल्या नसल्या तरी पहिल्या सामन्यात 6 तर दुसऱ्या सामन्यात 5 धावा करून रोहित शर्मा 2024 मध्ये आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये सर्वात जलद 1 हजार धावांचा टप्पा गाठणारा सध्याच्या घडीला एकमेव कॅप्टन ठरला आहे.
भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीच्या बॅटमधून बांगलादेश विरुद्ध पहिल्या टेस्ट सामन्यादरम्यान जास्त धावा निघाल्या नाहीत. त्याने पहिल्या इनिंगमध्ये 6 तर दुसऱ्या इनिंगमध्ये 17 धावा केल्या. मात्र यासह टीम इंडिया विराट कोहलीने भारतात आंतरराष्ट्रीय सामन्यादरम्यान 12 हजार धावा करण्याचा टप्पा पूर्ण केला आहे. जगभरात स्वतःच्या देशात 12 हजार धावांचा टप्पा पूर्ण करणारे फलंदाज हाताच्या बोटावर मोजण्या इरके आहेत. तर विराट हा भारतात आंतरराष्ट्रीय सामन्यादरम्यान 12 हजार धावा करणारा टीम इंडियाचा दुसरा फलंदाज ठरला आहे. यापूर्वी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याने 14 हजार धावा करण्याचा विक्रम केलेला आहे. तसेच अशी कामगिरी करणारे तो जगातला एकमेव फलंदाज आहे.
रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, ऋषभ पंत (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, जसप्रीत बुमराह, आकाश दीप, मोहम्मद सिराज
शादमान इस्लाम, झाकीर हसन, नजमुल हुसेन शांतो (कर्णधार), मोमिनुल हक, मुशफिकुर रहीम, शाकिब अल हसन, लिटन दास (विकेटकीपर), मेहदी हसन मिराझ, तस्किन अहमद, हसन महमूद, नाहिद राणा