India vs Australia Test Series: ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघ (Australia Cricket Team) 9 जानेवारीपासून सुरु होणाऱ्या भारताविरोधातील कसोटी मालिकेसाठी (India vs Aus Test Series) तयारी करत आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया संघ चार कसोटी सामने खेळणार आहे. कसोटी मालिकेआधी ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघ नेटमध्ये सराव करत घाम गाळत आहे. यादरम्यान भारताच्या फिरकी गोलंदाजांचा सामना करण्यासाठी ऑस्ट्रेलियाचे फलंदाज विशेष तयारी करत आहेत. यावेळी गोलंदाज महेश पिथिया (Mahesh Pirhiya)याने सर्वांचं लक्ष वेधलं आहे.
महेश पिथिया हुबेहुब रवीचंद्रन अश्विनप्रमाणे (R Ashwin) गोलंदाजी करतो. भारतीय फिरकी गोलंदाजांचा सामना करण्यासाठी ऑस्ट्रेलिया संघ नेटमध्ये महेश पिथियाच्या गोलंदाजीचा सामना करत आहे. महेश पिथिया गेल्या काही दिवसांपासून ऑस्ट्रेलिया फलंदाजांना गोलंदाजी करत असून यामध्ये स्टीव्ह स्मिथचाही समावेश आहे.
नेटमध्ये सराव करताना महेश पिथियाने स्टीव्ह स्मिथला घाम फोडला. त्याच्या गोलंदाजीवर स्टीव्ह स्मिथ वारंवार विकेट गमावत होता. महेश पिथियाची गोलंदाज समजण्यात स्टीव्ह स्मिथ अपयशी ठरत होता. यामुळे तो अपेक्षित खेळी करु शकत नव्हता.
How are the Aussies preparing for @ashwinravi99 ahead of their upcoming Test series with India? Well, they've only gone and flown in a near carbon copy of the star off-spinner as a net bowler | #INDvAUS pic.twitter.com/l9IPv6i43j
— cricket.com.au (@cricketcomau) February 3, 2023
तुमच्या माहितीसाठी, ऑस्ट्रेलिया संघाने नेटमध्ये सराव करण्यासाठी अनेक भारतीय गोलंदाजांना सोबत ठेवलं आहे. भारतीय गोलंदाजी समजता यावी यासाठी हा प्रयत्न आहे. महेश पिथिया हुबेहुब आर अश्विनप्रमाणे गोलंदाजी करत असल्याने त्याला बोलावण्यात आलं आहे.
याशिवाय जम्मू काश्मीरचा गोलंदाज आबिद मुश्ताकलाही नेटमध्ये सरावासाठी आणण्यात आलं आहे. आबिद मुश्ताक लेफ्ट-आर्म फिरकी गोलंदाज आहे. भारतीय संघात रवींद्र जाडेजा आणि अक्षर पटेल लेफ्ट-आर्म फिरकी गोलंदाज आहेत. यामुळेच ऑस्ट्रेलिया संघ फिरकी गोलंदाजांसाठी तयारी करत आहे.
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), शुभमन गिल, पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएस भरत (विकेटकीपर), ईशान किशन (विकेटकीपर), आर. अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव, जयदेव उनादकट, सूर्यकुमार यादव.
पैट कमिंस (कर्णधार), एश्टन एगर, स्कॉट बोलैंड, एलेक्स केरी, कैमरून ग्रीन, पीटर हैंड्सकॉम्ब, जोश हेजलवुड, ट्रेविस हेड, उस्मान ख्वाजा, मार्नस लाबुशेन, नाथन लियोन, लांस मॉरिस, टोड मर्फी, मैथ्यू रेनशॉ, स्टीव स्मिथ (उपकर्णधार), मिशेल स्टार्क, मिशेल स्वेपसन, डेविड वॉर्नर
पहिला सामना - 9 ते 13 फेब्रुवारी, नागपूर
दुसरा सामना- 17 ते 21 फेब्रुवारी, दिल्ली
तिसरा सामना - 1 ते 5 मार्च, धर्मशाळा
चौथा सामना- 9 से 13 मार्च, अहमदाबाद