IND vs AUS : तिसऱ्या कसोटीपूर्वी मोठी बातमी! 'या' भारतीय खेळाडूचा पत्ता कट?

Border Gavaskar Trophy 2023 :  दिल्लीमध्ये रंगलेली (sports news) दुसरी कसोटी 3 दिवसांमध्ये झाल्यानंतर आता तिसऱ्या कसोटीमध्ये (IND vs AUS) काय होणार याबद्दल क्रिकेटप्रेमींमध्ये (cricket news in marathi) उत्सुकता आहे. पण तिसऱ्या कसोटीमध्ये भारतीय टीम मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे. तिसऱ्या कसोटीपूर्वी 'या' भारतीय खेळाडूचा पत्ता कट होण्याची दाट शक्यता आहे.   

Updated: Feb 25, 2023, 09:58 AM IST
 IND vs AUS : तिसऱ्या कसोटीपूर्वी मोठी बातमी! 'या' भारतीय खेळाडूचा पत्ता कट?  title=
ind vs aus test 3 big news KS Bharat was dropped from the team and Opportunity in ishan kishan team india playing 11 cricket news in marathi

IND vs AUS Border Gavaskar Trophy :  भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीचा  (Border–Gavaskar Trophy) थरार सुरु आहे. दुसरा सामना दिल्लीमध्ये रंगल्यानंतर आता तिसरा सामना 1 मार्चपासून इंदूरला होणार आहे. त्यापूर्वी भारतीय संघातून (Team India) एक मोठी बातमी समोर आली आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या या कसोटी सामन्याच्या प्लेइंग इलेव्हनमधून एका खेळाडूचा पत्ता कट होण्याची दाट शक्यता आहे. दोन मालिकेतील त्याचा खराब कामगिरीमुळे टीम इंडिया हा निर्णय घेणार असल्याचं बोलं जातं आहे. कोण आहे हा खेळाडू आणि त्याचा पत्ता कट झाल्यावर कोणाला मिळणार संधी हे जाणून घेऊयात. 

तिसऱ्या कसोटीमध्ये 'या' खेळाडूला डच्चू?

ऑस्ट्रेलियाविरुद्ध सुरु असलेल्या कसोटीमध्ये विकेटकीपर केएस भरत  (KS Bharat) आणि इशान किशन (Ishan Kishan) या दोन खेळाडूंना संधी देण्यात आली. मात्र या दोन्ही मालिकेत केएस भरत फ्लॉप ठरला, त्यामुळे तिसऱ्या कसोटी सामन्यातून त्याला डच्चू देण्यात येणार आहे.  ऋषभ पंतच्या जागेवर केएस भरतला खेळण्याची संधी देण्यात आली होती पण त्याला या संधीचं सोन करता आलं नाही. केएस भरतची खेळी पाहिली तर पहिल्या मालिकेत तो 8 रन्स बनवून पवेलियनमध्ये परतला. दुसऱ्या डावात केएस भरतकडून भारतीय संघाला मोठ्या खेळीची अपेक्षा होती, मात्र त्याने 6 धावा करून आपली विकेट गमावली. तर कसोटी सामन्याच्या दुसऱ्या डावात केएस भरतच्या बॅटने 23 नाबाद धावा केल्या मात्र त्याचा फारसा फायदा संघाला झाला नाही. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by K S Bharat (@konasbharat)

आतापर्यंतची भरतची खेळी

आतापर्यंतची केएस भरतची खेळीबद्दल बोलायचं झालं तर देशांतर्गत क्रिकेटमध्ये त्यांनी उत्कृष्ट कामगिरी केली आहे. 86 सामन्यांमध्ये 37.95 च्या सरासरीनुसार त्यांने 4707 धावा ठोकल्या आहेत. या त्याने 9 शतके आणि 27 अर्धशतके झळकावली आहेत. 

'या' खेळाडूला मिळणार संधी

इंदूरमधील मालिकेत केएस भरत याचा जागेवर इशान किशन याला संधी मिळू शकते. इशान किशनला आतापर्यंत एकही कसोटी सामना खेळला नाही. त्यामुळे केएस भरतच्या जागेवर तिसऱ्या कसोटीमध्ये इशान खेळवलं जाऊ शकतं. इशानच्या खेळाबद्दल बोलायचं झालं तर वनडे आणि टी-20 मध्ये त्याने उत्तम कामगिरी केली आहे.