Rohit Sharma : टीम इंडिया ( Team India ) सध्या वेस्ट इंडिजविरूद्ध टी-20 सिरीज खेळतेय. या सिरीजमध्ये वेस्ट इंडिज 2-1 अशी आघाडीवर आहे. दरम्यान या सिरीजमध्ये टीम इंडिया ( Team India ) ची धुरा हार्दिक पंड्या ( Hardik Pandya ) कडे सोपवण्यात आली आहे. या दौऱ्यावर टीम इंडियाचा नियमित कर्णधार रोहित शर्मा आणि स्टार खेळाडू विराट कोहली यांना आराम देण्यात आला आहे. अशातच रोहित शर्माला टी-20 फॉर्मेटमध्ये न खेळण्याबाबत प्रश्न विचारण्यात आला. यावेळी रोहितने दिलेल्या उत्तराने सर्वजण हैराण झाले आहेत.
रोहित शर्मा आणि विराट कोहली या दोघांनी गेल्या वर्षी ऑस्ट्रेलियामध्ये झालेल्या टी-20 वर्ल्ड कपनंतर कोणताही टी-20 चा इंटरनॅशनल सामना खेळला नाही. रोहितच्या अनुपस्थितीत टीम इंडियाची धुरा हार्दिक पंड्या ( Hardik Pandya ) च्या खांद्यावर देण्यात आली आहे. यामध्ये टीम मॅनेजमेंट युवा खेळाडूंना या फॉर्मेमध्ये संधी देण्यात इच्छुक आहे.
दरम्यान टी-20 फॉर्मेटवर खेळण्याबाबत रोहित शर्माला प्रश्न विचारण्यात आला. याला उत्तर देताना रोहित शर्मा म्हणाला की, गेल्या वर्षी टी-20 वर्ल्डकप असताना सिनियर खेळाडू वनडे फॉर्मेटमध्ये खेळत नव्हते. त्यामुळे आता आगामी वनडे वर्ल्डकपच्या पार्श्वभूमीवर देखील हीच गोष्ट राबवण्यात येतेय.
यावेळी बोलताना रोहित ( Rohit Sharma ) पुढे म्हणाला की, यंदाच्या वर्षी वनडेचा वर्ल्डकप खेळायचा आहे. त्यामुळे आम्ही सर्वांना तंदुरूस्त ठेऊ इच्छितो. मुळात पहिल्यांदाच टीम इंडियामध्ये अनेकांना दुखापत झाली आहे. इतक्या खेळाडूंना दुखापत झाली असल्याने मला आता दुखापतीची भीती वाटू लागलीये.
रोहितने यावेळी टीम मॅनेजमेंटशी चर्चा केली असल्याचं सांगितलं. यावेळी बीसीसीआयसोबत वर्कलोड मॅनेजमेंट यांच्यावर देखील चर्चा केली असल्याचं कर्णधार रोहितने म्हटलंय. रोहित ( Rohit Sharma ) च्या म्हणण्यानुसार, खेळाडूंना होणाऱ्या दुखापतींची आता त्याला भीती वाटू लाहलीये. त्यामुळे खेळाडूंना पूर्ण आराम देण्यावर भर देण्याचा प्रयत्न सुरु आहे.
रोहित शर्मा ( Rohit Sharma ) म्हणाला की, "वर्ल्डकप तुम्हाला थाळीमध्ये सजवून मिळत नाही, तो जिंकण्यासाठी भरपूर मेहनत करावी लागते. 2011 पासून इतकी वर्ष आम्ही यासाठीच प्रयत्न करतोय. यंदाचा वर्ल्डकप जिंकण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत. मुळात आमच्या टीममध्ये असलेले सर्व खेळाडू चांगले आहे. मुख्य म्हणजे आमच्याकडे आत्मविश्वास आहे की, आम्ही हे करू शकतो."