Bangladesh Captain Shakib Al Hasan: आगामी वर्ल्ड कपपूर्वी आणि आशिया कप स्पर्धेपूर्वी बांग्लादेशच्या कॅप्टन तमिम इक्बाल (Tamim Iqbal) याने कर्णधारपदावरून पायउतार केल्याने बांगलादेशच्या वनडे कर्णधारपदाची ( Bangladesh Captain ) जागा रिक्त राहिली होती. त्यानंतर आता बांग्लादेशचा कॅप्टन कोण होणार? यावर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित होत होते. त्यानंतर आता सिलेक्टर्सने मोठा निर्णय घेत अनुभवी खेळाडूच्या खांद्यावर जबाबदारी सोपवली आहे.
बांग्लादेशचा स्टार अष्टपैलू खेळाडू शकीब अल हसनची आगामी आशिया चषक आणि विश्वचषक 2023 साठी संघाचा एकदिवसीय कर्णधार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. बीसीबी म्हणजेच बांगलादेश क्रिकेट बोर्डाने हा निर्णय घेतला आहे. दुखापतीमुळे तमीनने आशिया कपमधून माघार घेतली होती. त्यानंतर बांग्लादेशची जबाबदारी कोण सांभाळणार? असा सवाल विचारला जात होता. त्यानंतर आता पुन्हा एकदा संकटाच्या काळात शाकिब अल हसनच्या खांद्यावर जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
Shakib Al Hasan appointed as the new Bangladesh captain for ODIs.
He'll lead Bangladesh in the Asia Cup and the 2023 World Cup. pic.twitter.com/Km4EUtWjne
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) August 11, 2023
Shakib Al Hasan, 17 years of international cricket and counting.
#BCB | #cricket pic.twitter.com/fQQVCa64V1
— Bangladesh Cricket (@BCBtigers) August 6, 2023
शाकिब अल हसन आगामी आशिया कप स्पर्धा, न्यूझीलंड सिरीज आणि भारतात होणाऱ्या वर्ल्ड कपसाठी कॅप्टन असणार आहे, असं बीसीबीचे अध्यक्ष नजमुल हसन यांनी सांगितलं आहे. जेव्हा लंका प्रिमियर लीगमधील परततील तेव्हा त्यांच्याशी बोलणं होईल. त्यांच्याशी आगामी प्लॅनबद्दल चर्चा होणार आहे. आमची काल फोनवर चर्चा झाल्याची माहिती देखील बीसीबीच्या अध्यक्षांनी केली आहे. पाठीच्या दुखापतीतून सावरलेल्या तमीम इक्बालबद्दल आम्ही अजून काही सांगू शकत नाही. आशिया कपमध्ये आम्ही एक किंवा दोन सलामीवीर खेळू शकतो, असंही ते म्हणाले आहेत.
जेव्हा जेव्हा बांग्लादेशच्या कॅप्टन्सीवर प्रश्नचिन्ह उभे राहिले, तेव्हा शाकिब अल हसन धावून आल्याचं दिसून आलं आहे. 2009 ते 2011 च्या काळात शाकिबने 49 सामन्यात बांग्लादेशचं नेतृत्व केलंय. तर 2015 ते 17 च्या काळात त्याने मुर्तजाच्या गैरहजरीत बांग्लादेशचा मोर्चा सांभाळला. शाकिबने आतापर्यंत 19 कसोटी, 52 वनडे आणि 39 टी-20 सामन्यांमध्ये बांगलादेशचे नेतृत्व केले आहे.