'ग्लेन मॅक्सवेल सनकी' ! हे काय बोलून बसला विराट कोहली, पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल

World Cup 2023 News: ऑस्ट्रेलियाचा आक्रमक फलंदाज ग्लेन मॅक्सवेलने आयसीसी विश्वचषकात न भूतो न भविष्यतो अशी कामगिरी केली. अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात मॅक्सवेलने 201 धावांची नाबाद खेळी करत ऑस्ट्रेलियाला अशक्य असलेला विजय मिळवून दिला. 

राजीव कासले | Updated: Nov 8, 2023, 07:07 PM IST
'ग्लेन मॅक्सवेल सनकी' ! हे काय बोलून बसला विराट कोहली, पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल title=

World Cup 2023 News: आयसीसी विश्वचषकात अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात ग्लेन मॅक्सवेलने (Glenn Maxwell) ऐतिहासिक कामगिरी केली. 91 धावांवर 7 विकेट अशी बिकट अवस्था असताना ग्लेन मॅक्सवेलने एकाकी झुंज देत ऑस्ट्रेलियाला (Australia) विजय मिळवून दिला. ग्लेन मॅक्सवेलने 128 चेंडूत नाबाद 201 धावांची खेळी केली. यात मॅक्सवेलने 10 षटकार आणि 21 चौकरांची बरसात केली. एकट्या मॅक्सवेलने अफगाणिस्तानची (Afghanistan) सेमीफायनलमध्ये जाण्याची स्वप्न उद्ध्वस्त केली. पायात क्रॅम्प आल्यानंतरही मॅक्सवेल संघाच्या विजयासाठी खेळपट्टीवर भक्कमपणे उभा राहिला. त्याला धावताही येत नव्हतं, पण त्याने हार मानली नाही. 

मॅक्सवेलच्या खेळीचं कौतुक
लंगडत असतानाही मॅक्सवेलने एक पायावर षटकार आणि चौकारांची बरसात केली. मॅक्सवेल मैदानावर केवळ उभाच राहिला नाही तर ऑस्ट्रेलियाला अशक्य वाटणारा विजयही मिळवून दिला. मॅक्सवेलच्या या खेळीचं जगभरातून कौतूक होत आहे. अनेक दिग्गज क्रिकेटपटूंनी मॅक्सवेलची ही खेळा लाखात एक असल्याचं म्हटलं आहे. टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कहोलीनेही (Virat Kohli) मॅक्सवेलच्या या खेळीवर प्रतिक्रिया दिली आहे. विराट कोहलीची ही पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली आहे. 

विराट कोहलीची पोस्ट व्हायरल
विराट कोहलीने ग्लेन मॅक्सवेलच्या नाबाद 201 खेळीचं कौतुक करणारी पोस्ट शेअर केली आहे. आपल्या पोस्टमध्ये विराटने म्हटलंय, फक्त तूच असं करु शकतो, सनकी ग्लेन मॅक्सवेल. विराट कोहलीचीही इन्स्टा स्टोरी स्वत: ग्लेन मॅक्सवेलनही शेअर केली आहे. ग्लेन मॅक्सवेल आणि विराट कोहली दोघंही आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर बंगलोरसाठी खेळतात. कोहली आणि मॅक्सवेल दोघंही चांगले मित्रही आहेत. 

मॅक्सवेलची ऐतिहासिक खेळी
आयसीसी विश्वचषक 2023 स्पर्धेतील 39 वा सामना इतिहासातील सर्वात रोमहर्षक सामना ठरला. पराभवाच्या उंबरठ्यावर असलेल्या ऑस्ट्रेलियाला ग्लेन मॅक्सवेलने नुसताच विजय मिळवून दिला नाही तर सेमीफायनलमध्येही प्रवेश मिळवून दिला. पायाला दुखापत झाली असतानाही मॅक्सवेलने असा करिश्मा केला, ज्याची कोणी कल्पनाही केली नसेल. क्रिकेटच्या इतिहासात अशी खेळी क्वचितच पाहिला मिळाली असेल. ऑस्ट्रेलियाच्या विजयाने अफगाणिस्तानचा सेमीफायनलचा मार्ग जवळपास बंद झाल्यात जमा आहे. 

ऑस्ट्रेलियाच्या विजयाने पॉईंटटेबलमध्ये (Point Table) मोठा उलटफेर झालाय. ऑस्ट्रेलिया 12 पॉईंटसह तिसऱ्या क्रमांकावर पोहोचली असून चौथ्या स्थानासाठी आता न्यूझीलंड, पाकिस्तान आणि अफगाणिस्तान या तीन संघात जबरदस्त चुरस वाढलीय. न्यूझीलंडचा संघ सध्या चौथ्या क्रमांकावर आहे.