Rohit Sharma : रोहित शर्माने 'करुन दाखवलं', तीन ICC ट्रॉफी जिंकणाऱ्या एमएस धोनीलाहा जमलं नाही

World Cup 2023, IND vs ENG : आयसीसी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने विजायाचा षटकार लगावला आहे. यादरम्यान रोहित शर्माने असा पराक्रम केला आहे, जो एमएस धोणी आणि विराट कोहलीलाही जमला नाही.

राजीव कासले | Updated: Oct 30, 2023, 03:38 PM IST
Rohit Sharma : रोहित शर्माने 'करुन दाखवलं', तीन ICC ट्रॉफी जिंकणाऱ्या एमएस धोनीलाहा जमलं नाही title=

Rohit Sharma Captaincy Record: आयसीसी विश्वचषक स्पर्धेत टीम इंडियाने (Team India) विजयाचा षटकार लगावला आहे. कर्णधार रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखाली टीम इंडिया या स्पर्धेत आतापर्यंत अपराजित आहे. टीम इंडियाने पॉईंटटेबलमध्येही (World Cup PointTable) अव्वल स्थान गाठलं असून सेमीफायनलचं तिकिट जवळपास निश्चित झालं आहे. रविवारी टीम इंडियाने सहाव्या सामन्यात गतविजेत्या इंग्लंडचा दणदणीत पराभव केला. टीम इंडियाने इंग्लंडचा (India Beat England) तब्बल 100 धावांनी धुळ चारली. टीम इंडियाने पहिली फलंदाजी करताना 229 धावा केल्या. यात सर्वाधिक योगदान होतं ते कर्णधार रोहित शर्माचं. रोहित शर्माने 87 धावांची कॅप्टन इनिंग खेळी केली. यात 10 चौकार आणि 3 षटकारांचा समावेश होता. या खेळीच्या जोरावर टीम इंडियाने शानदार विजय मिळवला. या विजयाबरोबरच रोहित शर्माच्या नावावर एक शानदार रेकॉर्ड जमा झाला आहे. भारतासाठी तीन आयसीसी ट्रॉफी जिंकणाऱ्या महेंद्र सिंग धोनीलाही (MS Dhoni) असा पराक्रम करणं जमलेलं नाही.

रोहित शर्माने केला पराक्रम
इंग्लंडविरुद्धचा सामना हा रोहित शर्माचा टीम इंडियाचा कर्णधार म्हमून शंभरावा सामना होता. या सामन्यात टीम इंडियाने विजय मिळवला. या कामगिरीमुळे रोहित शर्माने एमएस धोनी आणि विराट कोहलीलाही मागे टाकलं आहे. कर्णधार म्हणून एमएस धोनी आणि विराट कोहलीला आपल्या शंभराव्या सामन्यात पराभव स्विकारावा लागला होता. धोनीने कर्णधार म्हणून आपला शंभरावा एकदिवसीय सामना श्रीलंकेविरुद्ध खेळला होता. तर विराट कोहली कर्णधार म्हणून इंग्लंडविरुद्ध 100 वा सामना खेळला होता. या दोन्ही सामन्यात टीम इंडियाला पाच विकेटने पराभव पत्करावा लागला आहे. 

शंभर नंबरी क्लबमध्ये समावेश
इंग्लंडविरुद्धच्या सामना हा रोहित शर्मासाठी कर्णधार म्हणून शंभरावा एकदिवसीय सामना होता. याबरोबरच भारतासाठी सर्वाधिक सामन्यांमध्ये कर्णधारपदाची जबाबदारी सांभाळणारा खेळाडू बनला आहे. अशी कामगिरी करणारा रोहित शर्मा हा भारताचा सातवा कर्णधार ठरला आहे. याआधी, मोहम्मद अझरुद्दीन, सौरव गांगुली, कपिल देव, राहुल द्रविड, एम एस धोनी आणि विराट कोहली या खेळाडूंनी ही कामगिरी केली आहे. यात टीम इंडियासाठी सर्वाधिक सामन्यात कर्णधार होण्याचा मान एमएम धोनीच्या नावावर आहे. एमएमस धोनीने तब्बल 332 एकदिवसीय सामन्यात टीम इंडियाचं कर्णधारपद सांभाळलं आहे. 

इंग्लंडविरुद्ध दमदार कामगिरी
आयसीसी विश्वचषक स्पर्धेत टीम इंडियाने गतविजेत्या इंग्लंडला धुळ चारली. टॉस जिंकून इंग्लंडचा कॅप्टन जोस बटलरने गोलंदाजीचा निर्णय घेतला. टीम इंडियाने पहिल्यांदा फलंदाजी करताना 229 धावा केल्या. यात रोहित शर्मा 87 आणि सूर्यकुमार यादवने 49 धावा केल्या. हे माफक आव्हानही इंग्लंडला पेलवता आलं नाही. जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमीने इंग्लंडच्या एकाही फलंदाजाला खेळपट्टीवर टिकू दिलं नाही. अवघ्या 129 धावांत इंग्लंडच्या संघाने शरणागती पत्करली. जसप्रीत बुमराहने तन मोहम्मद शमीने सर्वाधिक 4 विकेट घेतल्या.