वर्ल्ड कपदरम्यान 'या' खेळाडूला लागली लॉटरी, टीम इंडियात करणार एन्ट्री

IND vs AUS T20I Series: आयसीसी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत टीम इंडिया जबरदस्त फॉर्मात आहे. सलग आठ सामने जिंकत टीम इंडिया पॉईंटटेबलमध्ये नंबर वन असून सेमीफायनलमध्येही एन्ट्री केली आहे. यादरम्यान भारतीय क्रिकेटमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. 

राजीव कासले | Updated: Nov 8, 2023, 04:35 PM IST
वर्ल्ड कपदरम्यान 'या' खेळाडूला लागली लॉटरी, टीम इंडियात करणार एन्ट्री  title=

IND vs AUS T20I Series : रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने (Team India) आयसीसी विश्वचषक स्पर्धेच्या सेमीफायनलमध्ये (World Cup Semifinal) प्रवेश केला आहे. पॉईंटटेबलमध्येही टीम इंडिया नंबर वन असून सेमीफायनलमध्ये कोणत्या संघाशी गाठ पडणार याची उत्सुकता क्रिकेटप्रेमींना लागली आहे. येत्या 15 आणि 16 नोव्हेंबरला सेमीफायनल तर 19 नोव्हेंबरला फायनल खेळवली जाणार आहे. त्यानंतर लगेचच टीम इंडिया ऑस्ट्रेलियाविरुद्ध 5 सामन्यांची टी20 मालिका खेळणार आहे. पण मालिकेसाठी टीम इंडियातील सीनिअर खेळाडूंना विश्रांती दिली जाण्याची शक्यता आहे. यात रोहित शर्मा, विराट कोहली, जसप्रीत बुमराह सारख्या खेळाडूंचा समावेश असेल.

या खेळाडूची होणार एन्ट्री
भारत-ऑस्ट्रेलिया टी20 मालिकेत सीनिअर खेळाडूंना विश्रांती दिल्यास त्यांच्या जागी त्याच तोडीच्या अनुभवी खेळाडूंना संधी मिळेल. यात पहिल्या क्रमांकावर असेल तो अनुभवी वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार (Bhuvneswar Kumar). ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत भुवनेश्वरची टीम इंडियात एन्ट्री होण्याची शक्यता आहे. सीनिअर खेळाडूंच्या अनुपस्थितीतत भारतीय वेगवान गोलंदाजीची धुरा भुवनेश्वर कुमारवर असेल. गेल्या जवळपास वर्षभरापासून भुवने्श्वर कुमार टीम इंडियातून बाहेर आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलिया विरुद्धची टी20 सीरिज भुवनेश्वरच्या कारकिर्दीसाठी टर्निंग पॉईंट ठरु शकते. 

सैय्यद मुश्ताक अली ट्ऱ़ॉफीत दमदार कामगिरी
नुकत्याच झालेल्या सैय्यद मुश्ताक अली ट्रॉफीत भुवनेश्वर कुमारने दमदार कामगिरी केलीय. भुवनेश्वरने अवघ्या 7 सामन्यात 16 विकेट घेतल्या. यात एकदा पाच विकेट घेण्याचा पराक्रम केलाय. मुश्ताक अली ट्रॉफीतली कामगिरी भुवनेश्वरसाठी लाईफलाईन ठरू शकते. 

एकावर्षापूर्वी भारतासाठी शेवटचा सामना
2022 मध्ये खेळवण्यात आलेल्या टी20 वर्ल्ड कपमध्ये भुवनेश्वर कुमारचा समावेश होता. त्यानंतर नोव्हेंबर 2022 मध्ये न्यूझीलंडविरुद्ध टी20 मालिका खेळवण्यात आली. पण यानंतर भुवनेश्वर कुमार भारतीय संघात आपली जागा टिकवू शकला नाही. भुवनेश्वर भारतासाठी क्रिकेटच्या तीनही प्रकारात खेळला आहे. भारतासाठी भुवनेश्वर कुमार 21 कसोटी, 121 एकदिवसीय आणि 87 टी20 सामने खेळला आहे. यात कसोटी क्रिकेटमध्ये भुवनेश्वरने 63, एकदिवसीय क्रिकेटमध्ये 141 आणि टी20 क्रिकेटमध्ये 90 विकेट घेतल्या आहेत. 

विश्वचषकात टीम इंडिया फॉर्मात
आयसीसी विश्वचषक स्पर्धा आता अंतिम टप्प्यात पोहोचली असून भारताने आठ विजयासह सेमीफायनलमध्ये प्रवेश केला आहे. विशेष म्हणजे या स्पर्धेता टीम इंडियाने एकही पराभव स्विकारलेला नाही. टीम इंडियाचा मुकाबला पॉईंटटेबलमध्ये चौथ्या स्थानावर असलेल्या संघाशी होणार आहे, पण चौथ्यासाठी सध्य पाकिस्तान, न्यूझीलंड आणि अफगाणिस्तान या तीन संघांदरम्यान चुरस रंगलीय.