न्यूझीलंडविरुद्धच्या सेमीफायनलसाठी टीम इंडियाची Playing 11 ठरली, 'हे' खेळाडू बाहेर

World Cup 2023: आयसीसी विश्वचषक 2023 स्पर्धेतील पहिल्या सेमीफायनलचा सामना बुधवारी म्हणजे 15 नोव्हेंबरला खेळवला जाणार आहे. मुंबईच्या वानखेडे स्टेडिअमवर यजमान भारत आणि न्यूझीलंडचा संघ आमने सामने असणार आहे. या सामन्याआधी टीम इंडियाची प्लेईंग इलेव्हनचं चित्र स्पष्ट झालं आहे. 

राजीव कासले | Updated: Nov 14, 2023, 05:09 PM IST
न्यूझीलंडविरुद्धच्या सेमीफायनलसाठी टीम इंडियाची Playing 11 ठरली, 'हे' खेळाडू बाहेर title=

Team India Probable Playing-11: आयसीसी विश्वचषक 2023 स्पर्धेतला सेमीफायनलचा पहिला सामना येत्या 15 नोव्हेंबरला मुंबईच्या वानखेडे मैदानावर (Mumbai Wankhede Stadium) खेळवला जाणार आहे. पहिल्या सेमीफायनलमध्ये भारत आणि न्यूझीलंड (India vs New zealand) एकमेकांना भिडणार आहेत. न्यूझीलंडिविरुद्धच्या पहिल्या सेमीफायनलसाठी टीम इंडियाची प्लेईंग इलेव्हन (Team India Palying XI) जवळपास निश्चित झाली आहे. टीम इंडियाचे कोच राहुल द्रविड आणि कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) यांनी तसे संकेत दिले आहेत. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात खेळलेली प्लेईंग इलेव्हन नेदरलँडविरुद्धच्या सामन्यातही कायम ठेवण्यात आली होती. यावरुनच स्पष्ट होतं की रोहित शर्मा टीम इंडियात कोणताही बदल करु इच्छित नाही. 

या फलंदाजांवर जबाबदारी
टीम इंडियाची फलंदाजी या स्पर्धेत जबरदस्त फॉर्मात आहे. शुभमन गिल वगळता टॉपच्या चार फलंदाजांनी या स्पर्धेत शतकं ठोकली आहेत. यात विराट कोहलीने दोन शतकं लगावली आहेत. श्रेयस अय्यर आणि केएल राहुलने नेदरलँडविरुद्धच्या शेवटच्या लीग सामन्यात शानदार शतक झळकावलं. आता न्यूझीलंडविरुद्धही या खेळाडूंकडून मोठ्या अपेक्षा आहेत. रोहित शर्माच्या जोडीला शुभमन गिल भारतीय डावाची सुरुवात करतील. तर तिसऱ्या  क्रमांकावर विराट कोहली जबरदस्त फॉर्मात आहे. त्यानंतर चौथ्या क्रमांकावर श्रेयस अय्यर आणि पाचव्य क्रमांकावर केएल राहुल फलंदाजीला उतरतील. सहाव्या क्रमांकावर सूर्यकुमार यादवकडून मोठ्या अपेक्षा आहे. भारताची ही तगडी भिंत भेदणं न्यूझीलंडच्या संघाला अवघड जाणार आहे. 

भारताचं वेगवान त्रिकुट
फलंदाजी फॉर्मात असताना गोलंदाजीही भेदक होतेय. जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी आणि मोहम्मद शमी हे वेगवान त्रिकुट सध्या भलतंच फॉर्मात आहे. त्यामुळे तिघांचाही संघात समावेश असेल. मोहम्मद शमीने केवळ पाच सामन्यात 16 विकेट घेतल्या आहेत. तर जसप्रीत बुमराहा भारताचा आतापर्यंतचा सर्वाधिवक विकेट घेणारा गोलंदाज ठरलाय. बुमराहने नऊ सामन्यात 17 विकेट घेतल्या आहेत. 

याशिवाय ऑलराऊंडर रविंद्र जडेजानेही नऊ सामन्यात 16 विकेट घेण्याची कामगिरी केली आहे. तर चायनामन गोलंदाज कुलदीप यादवने नऊ सामन्यात 14 विकेट घेतल्या आहेत. विशेष म्हणजे टीम इंडियाच्या प्लेईंग इलेव्हनमधल्या प्रत्येक खेळाडूने या स्पर्धेत दमदार कामगिरी केली आहे. त्यामुळे आर अश्विन, शार्दुल ठाकूर, ईशान किशन आणि प्रसिद्ध कृष्णाला सेमीफायनल आणि फायनलचा सामना बेंचवर बसूनच पाहावा लागणार आहे. 

भारताची संभाव्य Playing XI

रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज