ICC Rankings: अव्वल स्थानी कायम राहण्यासाठी टीम इंडियाला काय करावं लागणार? समजून घ्या रँकिंगचं समीकरण

Team India in ICC ODI Rankings: आता टीम इंडियाला आयसीसी रँकिंगमध्ये ( ICC ODI Rankings ) पहिला नंबर टिकवून ठेवायचा असेल तर एक मोठं काम करावं लागणार आहे. जाणून घेऊया आयसीसी वनडे रँकिंगमध्ये ( ICC ODI Rankings ) पहिलं स्थान कायम ठेवण्यासाठीचं गणित कसं आहे.

सुरभि जगदीश | Updated: Sep 25, 2023, 03:23 PM IST
ICC Rankings: अव्वल स्थानी कायम राहण्यासाठी टीम इंडियाला काय करावं लागणार? समजून घ्या रँकिंगचं समीकरण title=

Team India in ICC ODI Rankings: टीम इंडिया आयसीसी रँकिंगमध्ये सध्या तिन्ही फॉर्मेटमध्ये नंबर 1 वर आहे. ऑस्ट्रेलिया विरूद्ध भारत यांच्यातील वनडे सिरीजमधील पहिली वनडे जिंकल्यानंतर भारताने अव्वल स्थान पटकावलं. आता टीम इंडियाला आयसीसी रँकिंगमध्ये ( ICC ODI Rankings ) पहिला नंबर टिकवून ठेवायचा असेल तर एक मोठं काम करावं लागणार आहे. जाणून घेऊया आयसीसी वनडे रँकिंगमध्ये ( ICC ODI Rankings ) पहिलं स्थान कायम ठेवण्यासाठीचं गणित कसं आहे.

मोहालीमध्ये विजयाचा झाला मोठा फायदा

भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिला सामना मोहालीच्या स्टेडियमवर खेळवण्यात आला होता. यावेळी पहिल्या वनडे सामन्यात टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाचा 5 विकेट्स राखून पराभव केला. यावेळी टीम इंडियाने 277 रन्सचं लक्ष्य 8 बॉल बाकी असताना 5 विकेट्स गमावून पूर्ण केलं होतं. यावेळी पहिल्या सामन्यात मिळालेल्या विजयाचा टीम इंडियाला मोठा फायदा झाला. यावेळी टीम इंडियाने आयसीसी रँकिंगमध्ये पहिला क्रमांक पटकावला.

टीम इंडिया सर्व फॉर्मेटमध्ये नंबर 1

पहिल्या वनडेतील विजयानंतर तिन्ही फॉरमॅटमध्ये टीम इंडिया नंबर-1 बनलीये. आयसीसी टी-20 आणि टेस्ट क्रमवारीत भारत आधीच अव्वल स्थानावर होती. आता त्याने वनडे क्रमवारीतही अव्वल स्थान पटकावलं आहे. एकाच वेळी तिन्ही फॉरमॅटमध्ये नंबर-1 स्थान मिळवणारा भारत दुसरा संघ आहे. यापूर्वी हा कारनामा दक्षिण आफ्रिकेने केला होता.

कसं टिकवून ठेवावा लागेल नंबर 1 

आता भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सिरीजमधील दुसरी वनडे 24 सप्टेंबर रोजी इंदूरच्या होळकर स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. तर शेवटची वनडे 27 सप्टेंबर रोजी राजकोटच्या SCA स्टेडियमवर रंगणार आहे. टीम इंडियाला तिन्ही फॉरमॅटमध्ये नंबर-1 राहायचं असेल तर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या उरलेल्या दोन वनडेपैकी एक सामना जिंकावा लागणार आहे. असं झालं तर वर्ल्डकप सुरु होताना टीम इंडिया नंबर 1 म्हणून स्पर्धेत पाऊल टाकणार आहे. 

जर पुढचे सामने टीम इंडिया हरली तर...

ऑस्ट्रेलियन टीमने इंदूर आणि राजकोटमध्ये झालेले दोन्ही वनडे जिंकले तर भारताचं मोठे नुकसान होणार आहे. यावेळी टीम इंडिया वनडे क्रमवारीमध्ये थेट तिसऱ्या क्रमांकावर घसरणार आहे. टीम इंडियाचे सध्या 116 रेटिंग पॉईंट्स आहेत, तर पाकिस्तान 115 गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. ऑस्ट्रेलिया 111 गुणांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे.