मुंबई : १८ मार्च.... ही तारीख दिनेश कार्तिकच्या नावानेच सगळ्यांच्या लक्षात राहील. दिनेश कार्तिकने आपल्या जबरदस्त कामगिरीने सामन्याची बाजी पलटवली. त्याने २९ धावांची तुफानी खेळी केली आणि भारतासाठी विजयश्री खेचून आणली.
त्याच्या या खेळीबाबत त्याचे सर्वत्र कौतुक होतेय. मैदानात असताना शेवटचा सिक्स मारताना कार्तिक काय विचार करत होता, तो जेव्हा बॅटिंगला आला तेव्हा त्याच्या मनात कोणते विचार सुरु होते असे एक ना अनेक प्रश्न क्रिकेट चाहत्यांना पडलेत. एका वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत दिनेशने या साऱ्या प्रश्नांची उत्तरे दिलीत.
यातील एक महत्त्वाचा प्रश्न म्हणजे जेव्हा एका बॉलमध्ये ५ धावा हव्या होत्या तेव्हा त्याच्या डोक्यात नेमका कोणता विचार सुरु होता?
यावर बोलताना कार्तिक म्हणाला, मला माहीत होतं की मी योग्यप्रकारे कनेक्ट केलंय मात्र तो फ्लॅट आहे. श्रीलंकेची मैदाने मोठी आहेत. माझ्या बॅटच्या मध्यभागी बॉल लागला होता त्यामुळे तो सिक्स जाईल असे वाटत होते. त्यासोबत माझी बॅट फिरली नव्हती. हा फ्लॅट असल्यामुळे मला थोडी शंका वाटत होती. मात्र तो षटकार ठरला.
निडास ट्रॉफीमध्ये भारतीय संघाने विजय मिळवल्यानंतर त्याने बीसीसीआय डॉट टीव्हीशी संपर्क साधल्यास, हा खूप खास अनुभव आहे. हा अनुभव माझ्यासोब कायम राहणार आहे. त्याने सांगितले आहे की, माझ्यासाठी गेल्या वर्षभराचा खेळातील प्रवास खास राहिलेला आहे. आणि यामध्ये सहभागी होऊन मी खूप खूष आहे. या टूर्नामेंटकरता भरपूर मेहनत केली आहे. आणि हा विजय आम्हाला आंनद देणारा आहे.