Hashmatullah Shahidi: माझा विश्वासच बसत नाहीये की...; पराभव पचवणं अफगाणी कर्णधाराला जातंय कठीण

Hashmatullah Shahidi: मुंबईच्या वानखेडे मैदानावर झालेल्या या सामन्यात अफगाणिस्तानने ( Australia vs Afghanistan ) टॉस जिंकून प्रथम फलंदाजी केली. यावेळी अफगाणिस्तानने 50 ओव्हर्समध्ये 5 विकेट्स गमावून 291 रन्स केले.

सुरभि जगदीश | Updated: Nov 8, 2023, 09:28 AM IST
Hashmatullah Shahidi: माझा विश्वासच बसत नाहीये की...; पराभव पचवणं अफगाणी कर्णधाराला जातंय कठीण title=

Hashmatullah Shahidi: यंदाच्या वर्ल्डकपमध्ये 39 वा सामना ऑस्ट्रेलिया विरूद्ध अफगाणिस्तान ( Australia vs Afghanistan ) यांच्यात खेळवण्यात आला होता. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर झालेला हा सामना रोमांचक झाला. ऑस्ट्रेलियाकडून ग्लेन मॅक्सवेलने ( Glenn Maxwell  ) एकट्यानेच हा सामना कांगारूंसाठी खेचून आणला. दरम्यान हातातील विजय निसटल्यानंतर अफगाणिस्तानचा कर्णधार हशमतुल्लाह शाहिदी ( Hashmatullah Shahidi ) निराश झाला होता. 

मुंबईच्या वानखेडे मैदानावर झालेल्या या सामन्यात अफगाणिस्तानने ( Australia vs Afghanistan ) टॉस जिंकून प्रथम फलंदाजी केली. यावेळी अफगाणिस्तानने 50 ओव्हर्समध्ये 5 विकेट्स गमावून 291 रन्स केले. या लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियन टीमची सुरुवात खूपच खराब झाली. मात्र ग्लेन मॅक्सवेलच्या ( Glenn Maxwell  ) द्विशतकाच्या जोरावर कांगारूंनी हा सामना जिंकला. 

पराभवानंतर काय म्हणाला हशमतुल्लाह शाहिदी?

ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तान यांच्यात खेळला गेलेला सामना अफगाणिस्तान ( Australia vs Afghanistan ) टीमने जवळपास जिंकला होता. मात्र, ग्लेन मॅक्सवेलच्या झंझावाती खेळीमुळे अफगाणिस्तान टीमला या सामन्यात पराभवाला सामोरं जावं लागलं. पराभवानंतर हशमतुल्लाह शाहिदी ( Hashmatullah Shahidi ) म्हणाला, "हे खूप निराशाजनक होतं. क्रिकेट हा मजेदार खेळ आहे. आम्ही गेममध्ये होतो, आमच्या गोलंदाजांनी चांगली सुरुवात केली. मात्र आम्ही काही संधी गमावल्या आणि त्याचा परिणाम आम्हाला भोगावा लागला.

अफगाणिस्तानच्या टीमने ग्लेन मॅक्सवेलला जीवदान दिलं. त्यानंतर मॅक्सवेलने अफगाणिस्तानच्या ( Australia vs Afghanistan ) गोलंदाजांना चांगलंच धुतलं. याबाबत हशमतुल्लाह( Hashmatullah Shahidi ) म्हणाला की, ग्लेन मॅक्सवेलचा ( Glenn Maxwell  ) कॅच सुटल्यानंतर तो थांबला नाही. विजयाचं श्रेय मी त्याला देऊ इच्छितो. मला वाटतं की, सोडलेले झेल महत्त्वाचे होते, त्यानंतर मॅक्सवेल खरोखरच चांगला खेळला. खरं तर आम्ही निराश झालो.

माझा तर विश्वासच बसत नाहीये. आम्ही विचारंही केला नव्हता की, असं काही होईल. पण हा एक खेळाचा भाग आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात आम्ही पुन्हा कमबॅक करण्याचा प्रयत्न करू. इब्राहिम झद्रानचा मलाही अभिमान आहे. तो वर्ल्डकपमध्ये शतक झळकावणारा पहिला अफगाणिस्तानचा फलंदाज ठरलाय, असंही कर्णधाराने ( Hashmatullah Shahidi ) म्हटलंय.