ड्रेसिंग रूमचा गोंधळ पाहून लाबुशेन संतापला; अंपायरकडे तक्रार करताच अजय जडेजाने केलं असं कृत्य की...

Ajay Jadeja: लक्ष्याचा पाठलाग करताना कांगारू टीमची अवस्था सुरुवातीला कमकुवत झाली. यावेळी ऑस्ट्रेलियाच्या डावाच्या सहाव्या ओव्हरमध्ये एक मजेदार घटना पाहायला मिळाली.

सुरभि जगदीश | Updated: Nov 8, 2023, 09:50 AM IST
ड्रेसिंग रूमचा गोंधळ पाहून लाबुशेन संतापला; अंपायरकडे तक्रार करताच अजय जडेजाने केलं असं कृत्य की... title=

Ajay Jadeja: मंगळवारी झालेल्या सामन्यात अनेक अफगाणिस्तान विरूद्ध ऑस्ट्रेलिया हा सामना अत्यंत रोमांचक झाला. यापूर्वी पाकिस्तान विरूद्ध झालेल्या सामन्यात राशिद खान आणि इरफान पठाण यांच्यातील डान्स व्हायरल झाला होता. तर ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या सामन्यात अफगाणिस्तानचा मेंटॉर अजय जडेजा कांगारूंची हालत पाहून डान्स करताना दिसला.  

वर्ल्ड कप 2023 चा 39 वा सामना अफगाणिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात वानखेडेवर गेला. या सामन्यात अफगाणिस्तानने प्रथम फलंदाजी करत 292 रन्सचं आव्हान कांगांरूना दिलं. यावेळी लक्ष्याचा पाठलाग करताना कांगारू टीमची अवस्था सुरुवातीला कमकुवत झाली. यावेळी ऑस्ट्रेलियाच्या डावाच्या सहाव्या ओव्हरमध्ये एक मजेदार घटना पाहायला मिळाली.

अजय जडेजाने लाबुशेनची घेतली फिरकी

मिशेल मार्श बाद झाल्यानंतर फलंदाजीला आलेल्या मार्नस लॅबुशेनला अफगाणिस्तानच्या ड्रेसिंग रूममध्ये गोंधळ वाढल्याचं लक्षात आलं. अफगाणिस्तानच्या ड्रेसिंग रूममध्ये झालेल्या गोंधळाबद्दल लाबुशेनने अंपायरकडे तक्रार केली. या गोंधळामुळे खेळाडूंचे लक्ष विचलित होत असल्याचं लाबुशेनचं मत होतं. काही वेळाने अफगाणिस्तान टीमचा मेंटॉर म्हणून सामील झालेला अजय जडेजा ड्रेसिंग रूममध्येच मजेशीर पद्धतीने डान्स करू लागला. ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय.

मंगळवारच्या सामन्यात अफगाणिस्तानच्या टीमने प्रथम टॉस जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. यावेळी ऑस्ट्रेलियाचे गोलंदाज ताकद दाखवतील अशी शक्यता होती. मात्र, अफगाणिस्तानचे दोन्ही ओपनर ऑस्ट्रेलियावर भारी पडले. रहमानउल्ला गुरबाज आणि इब्राहिम झद्रान यांनी चांगली सुरूवात दिली. यावेळी इब्राहिमने खणखणीत शतक ठोकलं. त्याने 143 बॉल्समघ्ये नाबाद 129 रन्सची खेळी उभारली. अफगाणिस्तानची इनिंग अखेरच्या टप्प्यात असताना राशिद खान धावून आला. राशिदने 18  बॉलमध्ये  35 रन्सची वादळी खेळी केली आणि टीमचा स्कोर 291 रन्सवर पोहोवला. 

मंगळवारी झालेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाला 292 रन्सचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाची सुरूवात खराब झाली. ट्रॅव्हिस हेड दुसऱ्याच ओव्हरमध्ये बाद झाला अन् कांगारूंची पडझड सुरू झाली. डेव्हिड वॉर्नर आणि मिचेल मार्श यांनाही मोठी खेळी साकारता आली नाही. मात्र, ऑस्ट्रेलियाकडून ग्लेन मॅक्सवेल एकटाच लढला. 292 रन्सचं टारगेट असताना त्याने 201 रन्सची शानदार खेळी केली. एकेकाळी ऑस्ट्रेलियाचा पराभव निश्चित मानला जात होता पण मॅक्सवेलने आपल्या तुफान खेळीच्या जोरावर विजयापर्यंत नेलं अन् ऑस्ट्रेलियाला सेमीफायनलमध्ये पोहोचवलं आहे.