मुंबईविरुद्धच्या मॅचमध्ये हैदराबादनं टॉस जिंकला

मुंबईविरुद्धच्या टी-20 मॅचमध्ये हैदराबादनं टॉस जिंकला आहे. 

Updated: Apr 12, 2018, 07:54 PM IST
मुंबईविरुद्धच्या मॅचमध्ये हैदराबादनं टॉस जिंकला title=

हैदराबाद : मुंबईविरुद्धच्या टी-20 मॅचमध्ये हैदराबादनं टॉस जिंकला आहे. हैदराबादचा कॅप्टन केन विलियमसननं टॉस जिंकून पहिले फिल्डिंगचा निर्णय घेतला आहे. या मॅचमध्ये मुंबईच्या टीममध्ये दोन बदल करण्यात आले आहेत. हार्दिक पांड्याऐवजी ऑस्ट्रेलियाचा ऑल राऊंडर बेन कटिंगला तर मिचेल मॅकलेनघनऐवजी प्रदीप सांगवानला टीममध्ये संधी देण्यात आली आहे. चेन्नईविरुद्धच्या मॅचमध्ये शेवटच्या बॉलला दुसरी रन काढताना हार्दिक पांड्याच्या पायाला दुखापत झाली होती.

चेन्नईविरुद्धच्या रोमहर्षक मॅचमध्ये मुंबईचा शेवटच्या बॉलवर पराभव झाला होता. त्यामुळे ही मॅच जिंकून पॉईंट्स टेबलमध्ये पहिले अंक मिळवण्याचं आव्हान रोहित शर्माच्या टीमपुढे असणार आहे. तर हैदराबादनं मात्र त्यांचा सलामीचा सामना जिंकला होता. त्यामुळे त्यांच्याकडे २ पॉईंट्स आहेत.

मुंबईची टीम

रोहित शर्मा, एव्हीन लुईस, ईशान किशन, सूर्यकुमार यादव, कृणाल पांड्या, कायरन पोलार्ड, बेन कटींग, मयंक मार्कंडेय, प्रदीप सांगवान, मुस्तफिजूर रहमान, जसप्रीत बुमराह

हैदराबादची टीम

ऋद्धीमान सहा, शिखर धवन, केन विलियमसन, मनिष पांडे, दीपक हुडा, युसुफ पठाण, शकीब अल हसन, राशीद खान, बिली स्टेनलेक, सिद्धार्थ कौल, संदीप शर्मा