Rohit Sharma-Suryakumar Yadav Viral Video: मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) यांची असलेली मैत्री सर्वांना माहितीये. दोघंही आयपीएलमध्ये एकाच टीमकडून खेळतात. सध्या आयपीएलचा 16 वा सिझन खेळवण्यात येतोय. यंदाच्या सिझनमध्ये मुंबई इंडियन्सची (Mumbai Indians) रॉयल चॅलेंजर बंगळूरूविरूद्ध (Royal Challengers Bangalore) चांगली कामगिरी झाली. सध्या मुंबईची टीम पॉईंट्स टेबलमध्ये तिसऱ्या स्थानावर आहे. अशातच आता सूर्या आणि रोहित शर्मा यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतोय. या व्हिडीओमध्ये रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादव एका वेगळ्याच अंदाजात दिसतायत.
व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये सूर्यकुमार यादव आणि रोहित शर्मा वयस्कर झालेले दिसून येताय. हा एका जाहिरातीच्या शूटचा व्हिडीओ आहे. या व्हिडीओमध्ये सूर्यकुमार यादव आणि रोहित शर्मा फार मस्तीच्या मूडमध्ये दिसून येतायत. हा व्हिडीओ जाहिरातीच्या शूटचं बिहाइन्ड सीन आहे.
दरम्यान यानंतर दोघांनाही मेकअप करण्यात येतो आणि अचानक हे दोघंही वयस्कर दिसू लागतात. मेकअपनंतर रोहित आणि सूर्याने चष्मा घातलाय. शिवाय दोघांच्याही शरीरावर कुर्ता-पायजमा दिसतोय. सूर्याच्या हातात बॅटसारखं काहीतरी दिसून येतंय. मात्र त्याच्या हाती असलेली ही वेगळी छडी आहे, जी एका बाजूने बॅटप्रमाणे दिसतेय.
सूर्या आणि रोहित शर्माची जोडी ही ड्रेसिंग रूममध्येही प्रचंड प्रसिद्ध आहे. मैदानावर देखील ज्यावेळी दोघं एकत्र खेळत असतात, त्यावेळी त्यांची जोडी धुमाकूळ घातले. असंच मैदानाबाहेरही त्यांची मैत्री दिसून आली.
आरसीबीचा पराभव करत मुंबईने पॉईंट्स टेबलमध्ये मोठी झेप घेतलीये. आरसीबीवर विजय मिळवण्याआधी मुंबईची टीम 8 व्या स्थानी होती. मोठ्या फरकाने सामना जिंकल्याने आणि विजयाचे 2 पॉईंट्स मिळाल्याने मुंबईने थेट 5 क्रमांकांने झेप घेतली आहे. 8 व्या क्रमांकावरुन मुंबईने थेट तिसऱ्या क्रमांकापर्यंत मजल मारली. मुंबईने 11 सामन्यांपैकी 6 सामने जिंकले असून त्यांचे 12 पॉईंट्स झालेत. तर मुंबईच्या टीमचं नेट रन रेट- 0.255 इतकं आहे.
आरसीबीने प्रथम फलंदाजी करत मुंबईला जिंकण्यासाठी 200 रन्सचं आव्हान दिलं होतं. यावेळी मुंबईने 16.3 ओव्हर्समध्ये 4 विकेट्स गमावून लक्ष्य पूर्ण केलं. मुंबईकडून सूर्यकुमार यादवने तुफान फलंदाजी केली. सूर्याने 34 बॉल्समध्ये 83 रन्स केले. त्याच्या या खेळीमध्ये 7 फोर आणि 6 सिक्सेसचा समावेश होता.