Hockey World Cup 2023: हॉकी वर्ल्डकप 2023 स्पर्धा रंगतदार वळणावर आली आहे. आता साखळी फेरीतील चित्र हळूहळू स्पष्ट होत आहे. ए ते डी पर्यंत असलेल्या एकूण 4 गटात प्रत्येकी चार संघ आहे. प्रत्येक संघाला साखळी फेरीत 3 सामने खेळायचे आहेत. प्रत्येक गटात टॉपला असलेल्या संघाला थेट उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळणार आहे. तर दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर असलेल्या संघाला क्रॉसओव्हर सामन्याला सामोरं जावं लागणार आहे. असं गणित असताना प्रत्येक गटातील एका संघांचं साखळी फेरीतच आव्हान संपुष्टात येईल, असंच चित्र आहे. ग्रुप बी मधील जापानचं आव्हान आता स्पर्धेत निमित्त मात्र आहे. दोन सामने गमवल्याने गटात चौथ्या स्थानावर आहे. तर तिसरा सामना जिंकला तरी फारसा फरक पडणार नाही. त्यामुळे जापानला स्पर्धेतून गाशा गुंडाळावा लागलं असंच म्हणावं लागेल. जापानचा साखळी फेरीतील शेवटचा सामना बेल्जियमसोबत 20 जानेवारीला असणार आहे.
जापान विरुद्ध कोरिया सामना अतितटीचा झाला. 15 मिनिटांच्या पहिल्या क्वॉर्टरमध्ये दोन्ही संघांनी प्रत्येकी एक एक गोल झळकावला. सामना सुरु झाल्यानंतर पहिल्या मिनिटातच जापानच्या नागायोशी केन यानं गोल करत दबाव निर्माण केला. मात्र कोरियाने आक्रमक खेळी सुरुच ठेवली. पहिल्या क्वार्टरच्या आठव्या मिनिटाला ली जूंगजूननं गोल झळकावत बरोबरी साधली. त्यामुळे दोन्ही संघ दुसऱ्या क्वार्टरमध्ये आघाडी घेण्यासाठी उत्सुक होते. मात्र कोरियाने आघाडी घेत जापानवर दबाव तयार केला. 23 व्या मिनिटाला ली जूंगजूननं गोल झळकावलं आणि आघाडी मिळवली. त्यानंतर तिसऱ्या आणि चौथ्या क्वार्टरमध्ये बरोबरी साधण्यात जापानला अपयश आलं. शेवटचं क्षणाला शिटी वाजली तेव्हा कोरियाने जापानवर 2-1 ने आघाडी मिळवली होती.
No lack in excitement despite the lack of goals in the second half! Japan gave it their all till the very end, but Korea defend brilliantly to take all 3 points! #HWC2023
- Download the @watchdothockey app for all updates. pic.twitter.com/Y6pZj9gQcI
— International Hockey Federation (@FIH_Hockey) January 17, 2023
बेल्जियम विरुद्ध जर्मनी यांच्यात साखळी फेरीतील दुसरा सामना रंगणार आहे. या स्पर्धेतील विजयी संघाचं थेट वर्णी उपांत्यपूर्व फेरीत लागणार आहे. पराभूत संघाला क्रॉसओव्हर सामन्यात झुंज देत उपांत्यपूर्व फेरी गाठावी लागणार आहे.