Hardik Pandya on Social media Trolling: आयपीएलपूर्वीच मुंबई इंडियन्सच्या टीमने मोठा निर्णय घेतला आणि रोहित शर्माच्या जागी हार्दिक पंड्याकडे कर्णधारपदाची धुरा सोपवली. यानंतर हार्दिक पंड्याला मोठ्या प्रमाणात ट्रोल केलं गेलं. हार्दिक पंड्याचं नाव जगातील उत्तम ऑलराउंडर्सपैकी एकामध्ये घेण्यात येतं. गेल्या काही दिवसांपासून दुखापतीमुळे तो मैदानापासून दूर होता. आयपीएल 2024 पूर्वी हार्दिक पूर्णपणे झाला असून सध्या तो त्याच्या एका वक्तव्यामुळे तो चर्चेत आला आहे.
हार्दिकचे भारतात लाखो चाहते आहेत. मात्र गेल्या काही दिवसांपासून त्याला मोठ्या प्रमाणात ट्रोलिंगचा सामना करावा लागतोय. अखेर या ट्रोलिंगला हार्दिकने चोख प्रत्युत्तर दिलं आहे. यूके 07 रायडर या यूट्यूब चॅनलवर हार्दिकला सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या सुपर कारसोबतच्या फोटोबद्दल विचारण्यात आलं. याबाबत पांड्याने खुलासा केला की, त्याला ही कार कोणा व्यक्तीने टेस्ट ड्राईव्हसाठी दिली होती. मी मीडियामध्ये कधीही भाष्य करत नाही, मी कधी केलं नाही आणि मला काही फरक पडत नाही.'
यावेळी हार्दिकला अजून एक प्रश्न विचारण्यात आला की, त्याच्या चाहत्यांना त्याच्याबद्दल काय माहित नाही? या प्रश्नावर हार्दिक म्हणाला, 'माझ्या चाहत्यांना माझ्याबद्दल एक गोष्ट माहित नाही की मी बाहेर जात नाही. गेल्या तीन-चार वर्षांत मी क्वचितच बाहेर गेलो आहे. मी तेव्हाच बाहेर जातो जेव्हा माझ्या मित्राच्या किंवा कोणाच्या ठिकाणी कार्यक्रम असतो ज्याकडे मी ते इग्नोर करू शकत नाही. मला घरात राहायला आवडतं.
हार्दिक पुढे म्हणाला की, एक वेळ अशी होती की मी 50 दिवस घराबाहेर पडलो नाही. मी होम लिफ्ट देखील पाहिलेली नाही. माझ्याकडे माझं होम जिम, होम थिएटर आहे. मुळात मला आवडलेल्या गोष्टी माझ्या घरात आहेत.
आयपीएल 2024 च्या ऑक्शनपूर्वी मुंबई इंडियन्सच्या टीमने गुजरातसोबत करार केला आणि हार्दिक पंड्याला आपल्या टीममध्ये घेतलं. इतकंच नाही तर कर्णधार रोहित शर्माला बाजूला सारून कर्णधारपदाची धुरा हार्दिकडे सोपवली. यानंतर हार्दिकला मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात आलं. मुंबई फ्रँचायझीचे अनेक चाहते त्याच्या विरोधात दिसून येतायत.