Team India Victory Parade : विजयवीर टीम इंडियाच्या स्वागतासाठी वानखेडे स्टेडियम तसेच नरीमन पॉईंट ते स्टेडियम दरम्यान मरिन ड्राईव्ह या परिसरात (Marine drive to Wankhede stadium) मोठी गर्दी झाली आहे. तर ऐतिहासिक वानखेडे स्टेडियम हाऊसफूल झाल्याचं पहायला मिळतंय. वानखेडेवर टीम इंडियाच्या खेळाडूंचं कौतूक होताना दिसतंय. अशातच वानखेडेवर हार्दिक हार्दिकचा जयघोष (Hardik Pandya chants in wankhede stadium) झाल्याचं दिसून आलंय. त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
हार्दिक पांड्याला जेव्हा मुंबई इंडियन्सचा कॅप्टन करण्यात आलं होतं. त्यावेळी मुंबईकरांनी पांड्याला चांगलच ट्रोल केलं होतं. वानखेडेवर प्रेक्षकांनी पांड्याला डिवचलं होतं. तर सोशल मीडियावर देखील पांड्यावर मोठ्या प्रमाणात टीका केली गेली होती. मात्र, पांड्याने त्याच्या खेळातून विरोधकांना उत्तर दिलंय. पांड्या खऱ्या अर्थाने टीम इंडियासाठी गेम चेंजर ठरला अन् विरोध संघाला ऑलराऊडर खेळीतून बाहेर काढलं. आता याच वानखेडेवर हार्दिक पांड्य़ा विलनपासून हिरो झाला आहे.
2 months after he was massively booed by the fans, HARDIK HARDIK chants take over Wankhede
GREATEST REDEMPTION IN THE HISTORY OF CRICKET!!!!#T20WorldCup pic.twitter.com/BMDQgWTyfT
— Vinesh Prabhu (@vlp1994) July 4, 2024
टी-20 वर्ल्डकप जिंकल्यानंतर टीम इंडिया आज सकाळी विशेष विमानानं दिल्लीत दाखल झाली. भारतीय संघानं 29 जूनला वेस्ट इंडिजच्या बार्बाडोस इथं रंगलेल्या टी-20 वर्ल्डकप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा पराभव करत जेतेपदावर नाव कोरलं होतं. त्यानंतर भारतीय क्रिकेट चाहत्यांच्या आनंदाला उधाण आलंय. वर्ल्डकप जिंकल्यापासून टीम इंडिया भारतात कधी दाखल होणार, याचीच उत्सुकता सर्वांना लागली होती. अखेर टीम इंडियाचं आज सकाळी 6 वाजता दिल्ली विमानतळावर आगमन झालं.
दिल्ली विमानतळावर उतरल्यानंतर एक-एक करुन भारतीय संघाचे खेळाडू बाहेर आले. त्यावेळी भारताचा कर्णधार रोहित शर्मानं तमाम भारतीय क्रिकेटप्रेमींचे डोळे जी गोष्ट पाहण्यासाठी आसुसले होते, तो वर्ल्डकप दाखवला. वर्ल्डकप पाहून विमानतळावरील क्रिकेटप्रेमींनी एकच जल्लोष केला. त्यानंतर टीम इंडियाचं दिल्लीच्या आयटीसी मौर्य हॉटेलमध्येही जल्लोषात स्वागत झालं. चाहत्यांच्या गराड्यात खेळाडूंनी हॉटेलमध्ये प्रवेश केला. टीम इंडियासाठी इथं एक खास केक देखील तयार करण्यात आला होता.