ऋषभ पंतला मोठा दिलासा, वॉर्नरसोबत या धडाकेबाज खेळाडूंची टीममध्ये एन्ट्री

दिल्लीच्या पराभवाचं ग्रहण संपलं, स्टार खेळाडूंची एन्ट्री तर पंतला दिलासा

Updated: Apr 3, 2022, 11:37 AM IST
ऋषभ पंतला मोठा दिलासा, वॉर्नरसोबत या धडाकेबाज खेळाडूंची टीममध्ये एन्ट्री title=

मुंबई : आयपीएलच्या पंधराव्या हंगामाला सुरुवात झाली. या हंगामात दिल्ली टीमला पहिल्यांदा पराभवाचा सामना करावा लागला. हार्दिक पांड्याच्या टीमने दिल्लीचा 14 धावांनी पराभव केला. दिल्लीचा कर्णधार ऋषभ पंतचं आता टेन्शन संपणार आहे. कारण धडाकेबाज खेळाडूंची टीममध्ये एन्ट्री होत आहे. त्यामुळे पुढचे सामने जिंकण्यासाठी या खेळाडूंचं बळ टीमला मिळणार आहे. 

ऑस्ट्रेलियाई स्टार ओपनर डेव्हिड वॉर्नर आणि दक्षिण आफ्रिकेचा स्टार बॉलर एनरिक नॉर्किया पुढच्या सामन्यासाठी उपलब्ध होऊ शकतात. दिल्ली टीमचे कोच रिकी  पाँटिंग यांनी ही माहिती दिली. पुढच्या सामन्यापर्यंत हे दोघंही टीममध्ये असतील अशी आशा त्यांनी व्यक्त केली आहे. 

दक्षिण आफ्रिकाची टीम सध्या बांग्लादेश दौऱ्यावर आहे. या दौऱ्यामध्ये आयपीएलमध्ये खेळणाऱ्या खेळाडूंचाही समावेश आहे. डेव्हिड वॉर्नर मुंबईत आला आहे. मिचेल मार्श काही दिवसांपासून मुंबईत आहे. हे सध्या क्वारंटाइनमध्ये आहेत. 

कोलकाता विरुद्धच्या सामन्यासाठी मार्श टीममध्ये खेळणं अपेक्षित आहे असं यावेळी बोलताना पाँटिंग म्हणाले. एनरिक सध्या दुखापतीमुळे बाहेर आहे. त्याला दक्षिण आफ्रिकेकडून खेळण्याची परवानगी मिळाल्यानंतर तो टीममध्ये येईल. 

दिल्ली टीमने मुंबई इंडियन्सचा 4 विकेट्सने पराभव केला होता. तर हार्दिक पांड्याची टीम गुजरातकडून दिल्लीला केवळ 14 धावांसाठी पराभवाचा सामना करावा लागला.