IPL मध्ये अंपायरविरोधात तक्रार, चुकीच्या निर्णयासाठी होणार शिक्षा?

सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स यांच्याच झालेल्या सामन्यात हा वाद निर्माण झाला होता. 

Updated: Apr 3, 2022, 11:23 AM IST
IPL मध्ये अंपायरविरोधात तक्रार, चुकीच्या निर्णयासाठी होणार शिक्षा? title=

मुंबई : आयपीएलच्या यंदाच्या सिझनला नीट सुरुवातंही झाली नाहीये आणि अशातच आता वादाला तोंड फुटलंय. सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स यांच्याच झालेल्या सामन्यात हा वाद निर्माण झाला होता. या सामन्यात थर्ड अंपायरने हैदराबादचा कर्णधार केन विलियम्सनला आऊट करार दिल्याने वाद झाला होता. 

या सामन्यात केन आऊट की नॉट आऊट यावर प्रश्न उपस्थित झाला. अनेकांचं म्हणणं होतं की, थर्ड अंपायरचा निर्णय चुकीचा आहे. दरम्यान यावरून आता सनरायझर्स हैदराबादच्या फ्रेंचायझीने संताप व्यक्त करत आयपीएल गवर्निंग काऊंसिलकडे थर्ड अंपायरची तक्रार केली आहे.

टीम मॅनेजमेंटच्या एका सदस्याने दिलेल्या माहितीनुसार, यासंदर्भात बीसीसीआयकडे लेखी तक्रार पाठवली आहे. नियमांनुसार कोचला आधी तक्रार करावी लागते आणि त्यानंतर बाकीची कारवाई केली जाते. 

सामन्यानंतर हैदराबाद टीमचे कोच टॉम मूडी म्हणाले की, केन विलिम्सनला आऊट देणं हे आश्चर्यकारक होतं, कारण प्रत्येकाने रिप्ले पाहिला होता.

नेमकं प्रकरण काय?

हैदराबाद फलंदाजी करत असताना राजस्थानकडून प्रसिद्ध कृष्णा दुसरी ओव्हर टाकत होता. या ओव्हरमधील चौथा बॉल विलियम्सनच्या बॅटला कट लागून विकेटकीपर संजू सॅमसनच्या हातात गेला. मात्र चेंडू संजूच्या हाती लागला, पण तो पकडू शकला नाही. यावेळी बॉल हवेत उडाला आणि स्लिपला उभ्या असलेल्या देवदत्त पडिकलकडे गेला. संजूकडून चुकलेल्या चेंडू देवदत्तने पकडला.

मात्र यावेळी तो मैदानावर उपस्थित असलेल्या अंपायरला कॅच पकडला गेला की बॉल जमिनीला लागला हे समजलं नाही. अंपायरने विलियम्सन आऊट असल्याचा सॉफ्ट सिग्नल दिला. आणि हे तपासण्यासाठी थर्ड अंपायरला विनंती केली. यावेळी थर्ड अंपायरने प्रत्येक अँगलमधून रिप्ले पाहिला आणि विलियम्सनला आऊट दिला. याच मुद्द्यावरून वाद निर्माण झाला.

फ्रेममध्ये नॉट आऊट दिसतोय केन विलियम्सन

रिप्लेमध्ये पाहिल्यानंतर व्हिडिओच्या पहिल्या फ्रेममधून चेंडू जमिनीला स्पर्श करत असल्याचं स्पष्टपणे दिसत होतं. यानंतर सोशल मीडियावर लोकांनी या निर्णयावर प्रतिक्रिया दिल्या आणि आऊट की नॉट आऊट अशी चर्चा सुरू झाली.