Yuvraj Singh : क्रिकेटर युवराज सिंहच्या अडचणीत वाढ, नक्की कारण काय?

युवराज अडचणीत  सापडलाय. गोव्यात (Goa) केलेल्या एका कृतीमुळे युवराजला नोटीस पाठवण्यात आली आहे.  

Updated: Nov 22, 2022, 11:52 PM IST
Yuvraj Singh : क्रिकेटर युवराज सिंहच्या अडचणीत वाढ, नक्की कारण काय? title=

मुंबई :  टीम इंडियाचा (Team India) माजी क्रिकेटर युवराज सिंह (Yuvraj Singh) निवृत्तीनंतरही सोशल मीडियावर (Social Media) कायम सक्रीय असतो. युवराज पुन्हा चर्चेत आलाय. मात्र यावेळेस कारण वेगळंय. युवराज अडचणीत  सापडलाय. गोव्यात (Goa) केलेल्या एका कृतीमुळे युवराजला नोटीस पाठवण्यात आली आहे. त्यानुसार युवराजला सुनावणीसाठी हजर रहावं लागणार आहे. (goa government give notice to former team indian crickter yuvraj singh notice from commercial uses casa singh villa)

गोवा पर्यटन विभागाने युवराजला नेमोरजिम हा व्हिला 'होमस्टे' म्हणून नोंदणी न करता चालवल्याबद्दल नोटीस दिली गेली आहे. या नोटीसनुसार, युवराजला 8 डिसेंबरला सुनावणीला हजर राहण्यास सांगितलंय. गोवा पर्यटन व्यापार अधिनियम 1982 नुसार, राज्यात नोंदणी केल्यानंतर 'होमस्टे' सुरु करता येतं.  

युवराजवर दंडात्मक कारवाई होणार?

युवराजला 8 डिसेंबरला सकाळी 11 वाजता सुनावणीला हजर रहायचंय. मात्र परवानगी न घेता तसेच नोंदणी न केल्याने तुमच्या विरुद्ध दंडात्मक कारवाई का करु नये, असा सवालही या नोटीसमध्ये विचारण्यात आलाय. त्यामुळे युवराजवर 8 तारखेला कारवाई होते की दिलासा मिळतो, याकडे सर्वांच लक्ष असणार आहे.