Shreyas Iyer मागे हात धुवून लागली 'ही' अभिनेत्री, सोशल मीडियावर करतेय ट्रोल

ऋषभ पंत नंतर आता श्रेयस अय्यर, हात धूवून मागे लागली ही अभिनेत्री, कोण आहे 'ती' Actress? 

Updated: Nov 22, 2022, 10:19 PM IST
Shreyas Iyer मागे हात धुवून लागली 'ही' अभिनेत्री, सोशल मीडियावर करतेय ट्रोल title=

मुंबई : न्युझीलंडविरूद्धची टी20 मालिका टीम इंडियाने (Team India) 1-0 ने जिंकली आहे. ही मालिका जिंकत हार्दिक पंड्याच्या (Hardik Pandya) नेतृत्वाखाली टीम इंडियाने इतिहास रचला आहे. टीम इंडियाच्या या ऐतिहासिक कामगिरीची चर्चा असताना आता न्यूझीलंड विरूद्ध फ्लॉप ठरलेला श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) देखील चर्चेत आला आहे. अय्यर चर्चेत येण्या मागचं कारण एक अभिनेत्री-मॉडेल ठरली आहे. नेमकं हे प्रकरण काय आहे, हे जाणून घेऊय़ात.

हे ही वाचा : एकच सामना जिंकला, तरीही टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय कसा? 
 
न्यूझीलंडविरुद्ध टी-20 मालिकेत टीम इंडियाचा फलंदाज श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) पूर्णपणे फ्लॉप ठरला होता. या मालिकेतील दुसऱ्या सामन्यात श्रेयस 13 धावा करून बाद झाला. श्रेयसच्या फ्लॉप फलंदाजीनंतर अभिनेत्री आणि मॉडेल असलेल्या अश्विनी आहेरने (Ashweenee Aher) त्याला ट्रोल केले होते. अश्विनीने श्रेयसला तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर टॅग करत त्याची खिल्ली उडवली होती. 

हे ही वाचा : ऑस्ट्रेलियन खेळाडूच मैदानावर अनोख सेलिब्रेशन, VIDEO झाला व्हायरल 

इन्स्टाग्राम स्टोरीत काय? 

भारत आणि न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यात खेळल्या गेलेल्या दुसऱ्या T20 सामन्यात अश्विनी आहेरने (Ashweenee Aher) एक इंस्टाग्राम स्टोरी शेअर केली होती. या स्टोरीच्या कॅप्शनमध्ये तिने लिहिले की, 'जर श्रेयस अय्यरने सामन्यापूर्वी माझ्यासोबत कॉफी घेतली असती, तर तोही SKY (सूर्यकुमार यादव) सारखा शतक ठोकू शकला असता. अश्विनीने अशी पोस्ट करताच ती तुफान व्हायरल झाली होती. 

आज पुन्हा ट्रोल केले

आजच्या तिसऱ्या टी20 सामन्यात श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) खातेही न उघडता बाद झाला. या सामन्यानंतर अश्विनी आहेरने आणखी एक इंस्टाग्राम स्टोरी शेअर केली आहे. यावेळी अश्विनीने श्रेयस अय्यरच्या (Shreyas Iyer)  खराब फलंदाजीवर लिहिले, 'मी तुला आधीच सांगितले होते की माझ्यासोबत कॉफी पिऊन जा, आता मला दोष देऊ नकोस.' या स्टोरीत तिने श्रेयस अय्यरला टॅग देखील केले होते. 

कोण आहे 'ती'?

अश्विनी आहेर (Ashweenee Aher) एक मॉडेल आणि अभिनेत्री आहे. सोशल मीडियावर ती खूप सक्रिय असते. सोशल मीडियावर ती तिचे बोल्ड ग्लॅमरस फोटो शेअर करत असते. अश्विनीचे इंस्टाग्रामवर 2 लाख 15 हजार फॉलोअर्स आहेत. सोशल मीडियावर ती खुपच चर्चेत असते. 

दरम्यान ही घटना ऋषभ पंत सारखंच श्रेयस अय्यरसोबत (Shreyas Iyer)  घडत असल्याचे दिसून येत आहे. श्रेयस अय्यरच प्रकरण वेगळ आहे, मात्र कनेक्शन बॉलिवूडचच येतेय. त्यामुळे या श्रेयस अय्यरची चर्चा सुरु झाली आहे.