गौतम गंभीरला राग अनावर, पकडली ट्रक ड्रायव्हरची कॉलर, माजी खेळाडूने सांगितला तो किस्सा

टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक असलेल्या गौतम गंभीरचा मैदानावरील 'अँग्री यंग मॅन' अंदाज सर्वांनीच पाहिला असेल. गंभीर अनेकदा मैदानात अग्रेसिव्ह झालेला दिसतो. पण मैदानाबाहेरील गौतमच्या 'गंभीरपणाचा' किस्सा त्याच्या सह खेळाडूने सांगितला आहे. 

पुजा पवार | Updated: Sep 16, 2024, 05:23 PM IST
गौतम गंभीरला राग अनावर, पकडली ट्रक ड्रायव्हरची कॉलर, माजी खेळाडूने सांगितला तो किस्सा  title=
(Photo Credit : Social Media)

Aakash Chopra About Gautam Gambhir : भारताचा माजी फलंदाज आणि सध्या टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक असलेल्या गौतम गंभीरचा मैदानावरील 'अँग्री यंग मॅन' अंदाज सर्वांनीच पाहिला असेल. गंभीर अनेकदा मैदानात अग्रेसिव्ह झालेला दिसतो. पण मैदानाबाहेरील गौतमच्या 'गंभीरपणाचा' किस्सा त्याच्या सह खेळाडूने सांगितला आहे. कॉमेंटेटर आणि माजी क्रिकेटर आकाश चोप्रा याने एका मुलाखती दरम्यान गंभीरचे अनेक किस्से सांगितले आहेत. यातील त्याने एक किस्सा सांगितलं ज्यात गंभीर एका ट्रक ड्रायव्हरशी भिडला होता.   

आकाशने राज शमानी याच्या पॉडकास्टमध्ये सांगितले की, 'गंभीर एक इमोशनल व्यक्ती आहे. जेव्हा कधी काही नवं करण्याची गोष्ट येते तेव्हा तो खूप मेहनत घेतो. तो थोडा गंभीर आहे पण त्याने खूप धावा केल्या आहेत. तो न्हेमी त्याच्या दृदयाचे ऐकतो. स्वभावावरून तो शॉर्ट टेम्पर असू शकतो पण प्रत्येकाचं चरित्र वेगळं असतं. आकाशने एक किस्सा सांगितला ज्यात गौतम गंभीर दिल्लीमध्ये एका ट्र्क ड्रायव्हरशी भिडला होता. यावेळी गंभीर त्याच्या कारमधून बाहेर निघाला आणि तो थेट ड्रायव्हरची कॉलर पकडण्यासाठी ट्र्कवर चढला. ट्र्क ड्रायव्हरने चुकीच्या पद्धतीने टर्न घेतला होता'. 

हेही वाचा : युवराज सिंहने बेस्ट प्लेईंग 11 मध्ये धोनीला केलं इग्नोर, थालाचे फॅन्स भडकले, पाहा VIDEO

 

आकाशने हे स्वीकारले की गंभीर त्याचा मित्र नव्हता कारण टीममध्ये सलामी फलंदाजासाठी खूप मोठी स्पर्धा होती. तो म्हणाला, 'आम्ही प्रतिस्पर्धी होतो कारण आम्ही एका स्थानासाठी लढत होतो. जेव्हा आम्ही खेळत होतो तेव्हा कोहली आणि धवनपैकी कोण्या एकालाच संधी मिळायची. सलामी फलंदाजासाठी वीरूला सुद्धा कोणती संधी नव्हतो म्हणून वीरूने नंबर चारवर फलंदाजी केली ज्यामुळे शिखर आणि विराट एक आणि तीन नंबरवर खेळू शकतील'. 

हेही वाचा : विराट कोहलीच्या रॉकेट शॉटने मोडली स्टेडियमची भिंत, जोरदार सिक्स पाहून प्रेक्षक हैराण

 

गौतम गंभीरच्या मैदानावरील अनेक फाईट्स गाजल्या आहेत. यात आयपीएल 2023 मध्ये विराट कोहलीशी मॅचनंतर झालेला वाद, शाहिद आफ्रिदीशी झालेला वाद इत्यादींचा समावेश आहे. राहुल द्रविडनंतर आता गौतम गंभीरकडे टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकाची सूत्र झोपवण्यात आली आहेत. भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यात 19 सप्टेंबर रोजी पहिला टेस्ट सामना खेळवण्यात येणार आहे. गौतम गंभीर मुख्य प्रशिक्षक झाल्यानंतर टीम इंडियाचा हा पहिलाच टेस्ट सामना असेल.