फ्रेंच ओपन महिला : सिमोना हालेप विजयी, पहिले ग्रॅण्ड स्लॅम नावावर

फ्रेंच ओपनमध्ये महिला एकेरीच्या सामन्यात रोमानियाची सिमोना हालेप हिने विजय मिळवत आपल्या नावावर  पहिले ग्रॅण्ड स्लॅम केले आहे 

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Jun 9, 2018, 11:10 PM IST
फ्रेंच ओपन महिला : सिमोना हालेप विजयी, पहिले ग्रॅण्ड स्लॅम नावावर title=

पॅरिस : फ्रेंच ओपनमध्ये महिला एकेरीच्या सामन्यात रोमानियाची सिमोना हालेप हिने विजय मिळवत आपल्या नावावर  पहिले ग्रॅण्ड स्लॅम केले आहे. तिने अमेरिकेच्या स्लोन स्टिफन्सला नमवत तिने विजय मिळवला आहे. सिमोना हालेपने स्लोन स्टिफन्सला ३-६, ६-४, ६-१ अशा सेटमध्ये हरवले.

तिसऱ्यांदा फ्रेंच ओपन फायनलमध्ये प्रवेश केलेल्या सिमोना हालेपने २ तास ३ मिनिटांमध्ये स्टिफन्सचे आव्हान संपुष्टात आणले. ४० वर्षांत ग्रँड स्लॅम मिळवणारी सिमोना हालेप ही रोमानियाची पहिली खेळाडू ठरली आहे. दरम्यान,सिमोना हालेपने स्पेनच्या गारबाइन मुगुरुजाचा ६-१, ६-४ ने पराभव करत फ्रेंच ओपनच्या फायनलमध्ये प्रवेश केला होता. आज सिमोनाने आपल्या कारकिर्दीतले पहिले ग्रँड स्लॅम जिंकले आहे.

२६ वर्षांच्या सिमोना हालेपने २०१४ आणि २०१७ मध्ये फ्रेंच ओपनमध्ये फायनलपर्यंत मजल मारली होती. मात्र तिला पराभव स्वीकारावा लागला. तर याच वर्षी ऑस्ट्रेलियन ओपनमच्या फानलमध्ये हालेपला डेन्मार्कच्या कॅरोलिन वोज्नियाकीकडून पराभव स्वीकारावा लागला होता.