सलग दुसऱ्या सामन्यात भारताचा पराभव

फिफा अंडर 17 वर्ल्ड कपमधील भारताचं आव्हान जवळपास संपुष्टात आलय. कारण भारताला सलग दुस-या पराभवाला सामोर जावं लागलय. 

Updated: Oct 9, 2017, 10:30 PM IST
सलग दुसऱ्या सामन्यात भारताचा पराभव title=

नवी दिल्ली : फिफा अंडर 17 वर्ल्ड कपमधील भारताचं आव्हान जवळपास संपुष्टात आलय. कारण भारताला सलग दुस-या पराभवाला सामोर जावं लागलय. 

साखळी सामन्यांतील रंगतदार झालेल्या लढतीमध्ये भारताला कोलंबियाकडून 2-1नं पराभव पत्करावा लागला. 

पहिल्या हाफमध्ये दोन्ही टीम्सनं गोल करण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले. मात्र एकाही टीमला गोल करता आला नाही. दुस-या हाफमध्ये 49व्या मिनिटाला जुआन पेनालॉझनं गोल करत कोलंबियाला खातं उघडून दिलं. यानंतर भारतानंही कमबॅक केलं. 

जॅकसन थॉनौजामनं 82व्या मिनिटाला गोल केला. या वर्ल्ड कपमधील भारताचा हा पहिला गोल ठरला. मात्र भारतीयांचा हा आनंद केवळ काही सेकंद टीकला. यानंतर लगेचच 83व्या मिनिटाला जुआन पेनालॉझनंनच दुसरा गोल करत कोलंबियाला 2-0नं आघाडी मिळवून दिली. 

याआधी पहिल्या सामन्यात भारताला अमेरिकेकडून पराभव पत्करावा लागला होता. अमेरिकेकडून भारताचा ३-० असा पराभव झाला होता.