WPL 2024 : गुजरात जायंट्सचा खेळ खल्लास? फायनलमध्ये पोहोचण्यासाठी कसं असेल समीकरण?

Gujarat Giants Final playoffs scenario : गुजरातला एकाही सामन्यात विजय मिळवला आला नाही. त्यामुळे त्यांना भोपळा फोडता आला नाही, तसेच त्यांचा रनरेट देखील -1.804 आहे.

सौरभ तळेकर | Updated: Mar 3, 2024, 11:32 PM IST
WPL 2024 : गुजरात जायंट्सचा खेळ खल्लास? फायनलमध्ये पोहोचण्यासाठी कसं असेल समीकरण? title=
Gujarat Giants WPL 2024 Final playoffs scenario

Gujarat Giants vs Delhi Capitals, WPL 2024: रविवारी खेळल्या गेलेल्या महिला प्रीमियर लीग (WPL 2024) सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने गुजरात जायंट्सचा 25 धावांनी पराभव केला. कर्णधार मेग लॅनिंगची अर्धशतकी खेळी अन् जोस जोनासनच्या भेदक गोलंदाजीमुळे दिल्लीने सहज विजय मिळवला. तर राधा यादवच्या अफलातून गोलंदाजीमुळे दिल्ली कॅपिटल्सला तिसरा विजय साकारता आला अन् आता दिल्लीचा संघ पाईंट्स टेबलमध्ये (WPL 2024 Points Table) अव्वल स्थानी विराजमान झाला. मात्र, गुजरातला पुन्हा एकदा पराभवाला समोरं जावं लागलं. अशातच आता गुजरातचा संघ फायनलमध्ये (Gujarat Giants) पोहोचणार का? असा सवाल विचारला जात आहे.

गुजरातला कसं मिळेल फायनलचं तिकीट? (Gujarat Giants Final playoffs scenario)

गुजरातसमोरचं आव्हान आता अवघड असणार आहे. गुजरातला एकाही सामन्यात विजय मिळवला आला नाही. त्यामुळे त्यांना भोपळा फोडता आला नाही, तसेच त्यांचा रनरेट देखील -1.804 आहे. अशातच आता गुजरातला फायनलमध्ये खेळायचं असेल तर उर्वरित सामने मोठ्या फरकाने जिंकावे लागली. त्यामुळे गुजरातचा संघ कमीतकमी तिसऱ्या स्थानावर पोहचू शकेल. एवढंच नाही तर आरसीबी आणि युपी वॉरियर्सला उर्वरित चार सामन्यापैकी कमीतकमी 3-3 सामन्यात पराभूत व्हावं लागेल. तरच गुजरात फायनलचं स्वप्न पुर्ण करू शकेल.

मागील हंगामात गुजरातचा संघ सपशेल फेल ठरल्याचं दिसून आलं होतं. त्यामुळे गुजरात जायंट्सने डब्ल्यूपीएलच्या दुसऱ्या सत्रासाठी रॅचेल हेन्सच्या जागी ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू मायकेल क्लिंगरला (Michael Klinger) त्यांच्या संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्त केलं होतं. मात्र, तरी देखील गुजरातचा संघ अपयशी ठरल्याचं पहायला मिळतंय.

गुजरात टायटन्सचा संघ -

स्नेह राणा (कर्णधार), लॉरा वोल्वार्ड, फोबी लिचफील्ड, प्रिया मिश्रा, त्रिशा पूजिथा, वेदा कृष्णमूर्ती, अॅश्लेघ गार्डनर, दयालन हेमलता, हरलीन देओल, कॅथरीन ब्राइस, तनुजा कान्वेर, बेथ मूनी, काशवी गौतम, लॉरेन चीटल, मन्नत कश्यप, मेघना सिंग, शबनम शकील.

गुजरातच्या उर्वरित लीगचं वेळापत्रक

6 मार्च – गुजरात जायंट्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (दिल्ली)
9 मार्च – मुंबई इंडियन्स विरुद्ध गुजरात जायंट्स (दिल्ली)
11 मार्च दिल्लीमध्ये – गुजरात जायंट्स विरुद्ध यूपी वॉरियर्स (दिल्ली)
13 मार्च- दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध गुजरात जायंट्स (दिल्ली)