Will Pucovski Video : ऑस्ट्रेलियाचा युवा फलंदाज फिलिप ह्युजेस याचा 10 वर्षांपूर्वी क्रिकेटच्या सामन्यादरम्यान मृत्यू झाला होता. त्यातून ऑस्ट्रेलिया क्रिकेट अजूनही सावरलं नाही. फिलिप ह्युजेस याला एक घातक बाऊंसर लागल्याने त्याचं निधन झालं होतं. अशातच आता ऑस्ट्रेलियाच्या आणखी एका युवा फलंदाजासोबत अशीच एक घटना घडली आहे. लाईव्ह सामन्यात विल पुकोव्स्कीच्या (Will Pucovski) डोक्याला बाउन्सर एक बाऊंसर लागल्याचं समोर आलंय. त्याचा व्हिडीओ (Viral Video) देखील सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यामुळे आता ऑस्ट्रेलिया क्रिकेट विल पुकोव्स्कीच्या हेल्थबाबत माहिती घेत आहे.
ऑस्ट्रेलियाच्या देशांतर्गत क्रिकेट स्पर्धा शेफिल्ड शील्डमध्ये होबार्टमध्ये व्हिक्टोरिया आणि तस्मानिया यांच्यात सामना खेळवला जात होता. मात्र, या सामन्यात विल पुरोव्स्की हा चेंडू डोक्याला लागल्यानं दुखापतग्रस्त झालाय. त्यानंतर त्याला मैदान सोडवं लागलं. गंमतीशीर गोष्ट म्हणजे विल पुरोव्स्की याला आत्तापर्यंत 13 वेळा डोक्याला बॉल लागल्याने मैदानातून बाहेर जावं लागलं आहे. मात्र, या सामन्यातील बाऊंसर इतका भेदक होता की विल पुरोव्स्की थेट जमिनीवर कोसळला.
होबार्टमधील बेलेरिव्ह ओव्हल येथे 442 धावांच्या विशाल लक्ष्याचा पाठलाग करताना व्हिक्टोरियाने निक मॅडिन्सन आणि मार्कस हॅरिस यांनी पहिल्या विकेटसाठी 178 धावा जोडून शानदार सुरुवात केली. मात्र, पहिली विकेट गेल्यानंतर विल पुरोव्स्की मैदानात आला. मैदानात आल्यावर सेट होण्यासाठी त्याने तयारी केली. मात्र, विरोधी संघाने त्याला बाद करण्याचे प्रयत्न सुरू केले. त्यावेळी रिले मेरिडिथचा सामना करताना विल पुरोव्स्की दोन बॉल खेळून काढले. मात्र, तिसऱ्या बॉलने थेट विल पुरोव्स्कीच्या हेलमेटचा वेध घेतला अन् बॉल त्याच्या हेलमेटवर जाऊन आदळला.
पाहा Video
Luckless Victorian Will Pucovski, again hit by a short ball. He's gone off, retired hurt. Awful to see. @9NewsMelb pic.twitter.com/sp1YtP5Owd
— Trent Kniese (@trent_kniese) March 3, 2024
दरम्यान, विल पुरोव्स्की मैदानात कोसळल्यानंतर सर्व खेळाडूंनी स्ट्राईककडे धाव घेतली. तर डॉक्टरांनी देखील मैदानात आले. त्यांनी विल पुरोव्स्कीला तपासलं अन् त्याला मैदानाबाहेर जाण्याचा सल्ला दिला. त्यानंतर त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. वैद्यकीय कर्मचारी त्यांची पूर्ण काळजी घेत आहेत, असं क्रिकेट व्हिक्टोरियाने जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे.