Ex Pakistani Cricketer Danish Kaneria : गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानी क्रिकेट संघातील माजी फिरकीपटू दानिश कनेरिया (Danish Kaneria) चर्चेत आहे. पाकिस्तान क्रिकेटमध्ये (Pakistan Cricket) आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळणार दानिश कनेरिया या दुसरा हिंदू खेळाडू आहे. इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने (ECB) स्पॉट फिक्सिंग प्रकरणात दानिशवर आजीवन क्रिकेट खेळण्यास बंदी घातली होती. दानिश कनेरियानेही या बंदीच्या विरोधात अनेकदा आवाज उठवला होता. दानिश कनेरियाने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. शाहिद आफ्रिदी त्याच्यावर इस्लाम धर्म स्वीकारण्यासाठी खूप दबाव आणत होता, असेही कनेरियाने म्हटलं आहे. अशातच त्याने आता आफ्रिदीबाबत एक धक्कादायक खुलासा केला आहे.
मुलाखतीमध्ये दानिश कनेरियाने ड्रेसिंग रुममध्ये मला अस्पृश्यांसारखे कसे वागवले जाते हे देखील सांगितले होते. अशातच आता दानिश कनेरियाने शाहिद आफ्रिदीची एक जुनी क्लिप शेअर केली आहे, ज्यामध्ये त्याने सांगितले आहे की, एकदा त्याची मुलगी पूजा करत होती आणि हे पाहून त्याने टीव्ही तोडला. कनेरियाने सोशल मीडियावर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. "शाहिद आफ्रिदीने टीव्ही तोडला कारण त्याची मुलगी पूजा करत होती. जर तो तिच्या निष्पाप मुलीशी असे वागू शकतो तर तो माझ्याशी कसे वागला असेल याची कल्पना करा," असे दानिश कनेरियाने लिहीलं आहे.
काय आहे त्या व्हिडीओमध्ये?
दानिश कनेरियाने पोस्ट केलेली ही क्लिप एका खूप जुन्या पाकिस्तानी शोची आहे. अँकरने आफ्रिदीला विचारले की तू कधी टीव्ही तोडला नाहीस का? त्यावर आफ्रिदीने एक किस्सा सांगितला. 'माझी बायको स्टारवर मालिका बघायची. ते बघून त्यावेळी माझी मुलगी टीव्हीसमोर ताट फिरवत होती. याला काय म्हणतात? असे आफ्रिदीने विचारलं. त्यावर अँकरने त्याला आरती म्हणतात, असे आफ्रिदीला सांगितले. त्यानंतर मला इतका राग आला की त्याने टीव्ही भिंतीवर फेकला, असे आफ्रिदीने म्हटलं.
Shahid Afridi broke TV because his daughter was performing Pooja.
Just imagine if he could do this to her innocent daughter, how would he have treated me. https://t.co/bcjy6LqnoA
— Danish Kaneria (@DanishKaneria61) October 27, 2023
पंतप्रधान मोदींकडे मागितली होती मदत
या मुलाखतीमध्ये दानिश कनेरियाने आपण भारताचं कौतुक केल्यानंतर आपल्याला देशद्रोही म्हटलं गेल्या दावा केला होता. "मी नरेंद्र मोदींना आणि बीसीसीआयला आवाहन करु इच्छितो की माझ्यावर इंग्लिश क्रिकेट बोर्डाने केलेले आरोप आणि घातलेली बंदी रद्द करण्यासाठी मदत करावी," असंही दानिश कनेरियाने मुलाखतीत म्हटलं आहे.