दुबई : आयपीएलच्या यंदाचा मोसम सुरू व्हायला १० दिवसांचा कालावधी बाकी आहे. पण १३व्या मोसमाच्या सुरुवातीच्या काही मॅचना इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाचे दिग्गज खेळाडू मुकणार आहेत. इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियात सुरु असलेल्या सीरिजमुळे हे खेळाडू आयपीएलच्या सुरुवातीच्या काही मॅच खेळू शकणार नाहीत.
मुंबई इंडियन्सच्या टीममध्ये सध्या इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया सीरिज खेळणारे खेळाडू नाहीयेत. चेन्नई, राजस्थान, बंगळुरू, हैदराबाद, पंजाब, दिल्ली आणि कोलकात्याच्या टीममध्ये इंग्लंड ऑस्ट्रेलियाचे मोठे खेळाडू आहेत.
चेन्नई
सॅम कुरन, जॉस हेजलवूड
बंगळुरू
मोईन अली, एरॉन फिंच, एडम झम्पा
राजस्थान
स्टीव्ह स्मिथ, जोफ्रा आर्चर, एन्ड्रू टाय, बेन स्टोक्स, टॉम कुरन
हैदराबाद
जॉनी बेयरस्टो, डेव्हिड वॉर्नर
पंजाब
ग्लेन मॅक्सवेल, क्रिस जॉर्डन
दिल्ली
मार्कस स्टॉयनीस, एलेक्स कॅरी
कोलकाता
इयन मॉर्गन, पॅट कमिन्स
इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाची सीरिज १६ सप्टेंबरला संपणार आहे. तर आयपीएलला १९ सप्टेंबरला सुरूवात होणार आहे. पण कोरोना व्हायरसपासून संरक्षण करण्यासाठी बायो सिक्युअर बबल नियमामुळे या खेळाडूंना सुरुवातीच्या मॅच खेळता येणार नाहीत. या नियमामुळे खेळाडूंना एक आठवड्यापर्यंत क्वारंटाईन व्हावं लागणार आहे.
क्वारंटाईन असताना खेळाडूंना तीन ते चारवेळा कोविड-१९ टेस्ट करावी लागणार आहे. या टेस्टचे सगळे रिपोर्ट निगेटिव्ह आले तरच खेळाडूंना टीममध्ये सामील करण्यात येणार आहे. यामध्ये ८ ते ९ दिवसांचा वेळ जाणार आहे, त्यामुळे इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाचे खेळाडू २ ते ३ मॅच खेळू शकणार नाहीत.