David Willey चा कॅच सोडणं टीम इंडियाला महागात, विजयासाठी 247 धावांचं आव्हान

टीम इंडियाच्या गोलंदाजांसमोर इंग्लंडची शरणागती

Updated: Jul 14, 2022, 09:48 PM IST
David Willey चा कॅच सोडणं टीम इंडियाला महागात, विजयासाठी 247 धावांचं आव्हान  title=

मुंबई : टीम इंडियाच्या भेंदक गोलंदाजीमुळे इंग्लंडचा संघ 246 धावावर ऑल आऊट झाला आहे.  त्य़ामुळे भारतासमोर 247 धावांचे आव्हान असणार आहे. विशेष म्हणजे एक कॅच सुटल्यामुळे इंग्लंडची धावसंख्या इतकी पोहोचली. अन्यथा 200 धावसंख्येवर हा संघ ऑलआऊट झाला होता. दरम्यान टीम इंडिया या धावांचा पाठलाग करताना आता कळणार आहे की ही एक कॅच किती महागात पडणार आहे.  

टीम इंडियाने टॉस जिंकत फिल्डींगचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे फलंदाजीला उतरलेल्या इंग्लंडची सुरुवात काहीशी चांगली झाली नाही. इंग्लंडकडून मोईन अलीने सर्वांधिक 47 धावा केल्या. त्याच्यानंतर डेव्हिड विलीने 41 धावांचे योगदान दिले. याशिवाय जॉनी बेअरस्टोने 38 आणि लियाम लिव्हिंगस्टोनने 33 धावा केल्या. या धावांच्या बळावर इंग्लंड संघ 246 धावा गाठू शकला. 

भारताकडून युझवेंद्र चहलला सर्वाधिक चार विकेट घेतले तर दुसरीकडे हार्दिक पांड्या आणि जसप्रीत बुमराहने प्रत्येकी दोन आणि शमी आणि प्रसिद्द कृष्णाने 1 विकेट घेतली आहे. 

'ती' चुक महागात पडणार 
या सामन्यात डेव्हिड विलीने 41 धावा ठोकल्या आहेत. डेव्हिडने बॅटींगच्या सुरुवातीला 1 धावांवर असताना एक चुकीचा शॉट खेळला.या शॉटमुळे त्याचा विकेट गेला असता.मात्र हा विकेट घेण्यास टीम इंडिया अपयशी ठरली. हार्दीक पंड्याच्या गोलंदाजीवर डेव्हिड मोठा शॉट खेळला, आणि हा बॉल थेट प्रसिद्द कृष्णाच्या हातात गेला होता. मात्र हातात आलेली सिम्पल कॅचने त्याने सोडली. त्यामुळे त्या एका चुकीमुळे धावसंख्या 246 पर्यंत पोहोचली.आता टीम इंडिया ही धावसंख्या पुर्ण करताना कळणार आहे ही कॅच किती महागात पडणार आहे.