Dwayne Bravo Retirement : वेस्ट इंडिजचा माजी अष्टपैलू खेळाडू ड्वेन ब्राव्होने (Dwayne Bravo) इंडियन प्रीमियर लीगमधून (IPL) निवृत्ती जाहीर केली आहे. सोशल मीडियावर पोस्ट टाकून त्याने याबाबतची माहिती दिली आहे. त्यामुळे चेन्नईच्या (Chennai Super Kings) फॅन्सची निराशा झाली आहे. मात्र तरीही त्याला पिवळ्या जर्सीत फॅन्सना पाहता येणार आहे. कारण त्याला चेन्नईने एक मोठी जबाबदारी दिली आहे. ही जबाबदारी काय आहे, हे जाणून घेऊयात.
हे ही वाचा : Ruturaj Gaikwad ने रचला इतिहास, Vijay Hazare Trophy त मोठा रेकॉर्ड
ड्वेन ब्राव्होने (Dwayne Bravo Retirement) इंडियन प्रीमियर लीगमधून (IPL) निवृत्ती जाहीर केली आहे. त्यामुळे अनके फॅन्सची निराशा झाली आहे.मात्र तरीही तो चेन्नईच्या जर्सीत दिसणार आहे. कारण त्याच्या निवृत्तीनंतर चेन्नईने त्याला मोठी जबाबदारी दिली आहे.
ड्वेन ब्राव्होने (Dwayne Bravo) आयपीएलमधून निवृत्ती जाहीर करताच चेन्नईने (Chennai Super Kings) त्याला मोठी जबाबदारी दिली आहे. निवृत्तीनंतर आयपीएल 2023 साठी तो चेन्नई सुपर किंग्जचा गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून काम करणार आहे. त्यामुळे आता तो चेन्नईच्या बॉलर्सना गोलंदाजीचे धडे देताना दिसणार आहे.
हे ही वाचा : Ruturaj Gaikwad ची शतकांची हॅट्ट्रीक, सौराष्ट्र विरूद्ध खणखणीत शतक
ड्वेन ब्राव्हो (Dwayne Bravo Retirement) त्याच्या निवृत्तीच्या पोस्टमध्ये म्हणतो,“ माझे खेळाचे दिवस पूर्ण झाले आहेत. मी स्वतःला असे काही करताना पाहत आहे. मी या नवीन प्रवासाची वाट पाहत असल्याचे त्याने म्हटले आहे. ब्राव्हो पुढे म्हणतो की, मला गोलंदाजांसोबत काम करायला आवडते आणि ही भूमिका मला खूप आवडली आहे.
खेळाडूपासून ते आता प्रशिक्षकापर्यंत, मला फारसे जुळवून घ्यावे लागेल असे वाटत नाही. कारण मी खेळत असताना नेहमी गोलंदाजांसोबत काम करतो आणि फलंदाजांपेक्षा एक पाऊल पुढे कसे असावे यासाठी योजना आखण्याचा प्रयत्न करतो.
फरक इतकाच आहे की, मी यापुढे मिड-ऑन किंवा मिड-ऑफवर उभा राहणार नाही.
ब्राव्हो पुढे (Dwayne Bravo) म्हणतो,आयपीएलच्या इतिहासात मी आघाडीचा विकेट घेणारा गोलंदाज असेल असे मला कधीच वाटले नव्हते. पण आयपीएलच्या इतिहासाचा एक भाग झाल्याचा मला आनंद आहे, असे शेवटी तो म्हणतो.
ड्वेन ब्राव्होनेच्या (Dwayne Bravo Retirement) निवृत्तीने चेन्नईच्या फॅन्सची निराशा झाली आहे. मात्र तरीही तो पिवळ्या जर्सीत दिसणार आहे. चेन्नईसाठी त्याचे योगदान कायम असणार आहे. त्यामुळे चेन्नईच्या फॅन्सना काहिसा दिलासा मिळाला आहे.