Virat Kohli च्या मुंबईतील आलिशान घराची किंमत आज इतकी...

विराट कोहली आणि अनुष्का शर्मा मुंबईत सी-फेसिंग अपार्टमेंटमध्ये राहतात.

Updated: Jan 19, 2022, 05:49 PM IST
Virat Kohli च्या मुंबईतील आलिशान घराची किंमत आज इतकी... title=

मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा सर्वात यशस्वी कसोटी कर्णधार विराट कोहलीने नुकताच कर्णधारपदाचा राजीनामा दिला असून, तेव्हापासून तो बराच चर्चेत राहिला आहे. पण आज या रिपोर्टमध्ये विराटच्या करिअरची नाही तर त्याच्या लग्झरी लाईफबद्दल काही गोष्टी समोर येणार आहेत.

नेहमीच चर्चेत असलेल्या विराट कोहलीच्या मुंबईतील आलिशान घराचे काही inside फोटो समोर आले आहेत. जिथे तो पत्नी आणि अभिनेत्री अनुष्का शर्मासोबत राहतो. टीम इंडियाचा स्टार फलंदाज कोहलीचे आलिशान घर ही अनेकांसाठी स्वप्नवत आहे.

विराट कोहली आणि अनुष्का शर्मा मुंबईत सी-फेसिंग अपार्टमेंटमध्ये राहतात. जे 35 व्या मजल्यावर आहे. लग्नानंतर विराट आणि अनुष्का या फ्लॅटमध्ये शिफ्ट झाले होते.

विरुष्काचे हे आलिशान घर मुंबईतील ओंकार-1973 इमारतीत बनवले आहे. हा फ्लॅट 7171 स्क्वेअर फूटचा आहे.

विराट कोहली-अनुष्का शर्माच्या या लक्झरी फ्लॅटमध्ये 5 बेडरूम आहेत. फ्लॅटची प्रत्येक बेडरूम आणि लिव्हिंग रूम समुद्राचे अतिशय सुंदर दृश्य देते.

विरुष्काच्या या फ्लॅटची किंमत जवळपास 34 कोटी रुपये असल्याचे सांगितले जात आहे. विराटच्या घरात आधुनिक फर्निचर बसवण्यात आले असून भिंतींना पांढरा रंग देण्यात आला आहे. जे घराच्या सौंदर्यात भर घालत आहे.

कोहली आणि अनुष्काच्या घरात एक खूप मोठी आणि सुंदर बाल्कनी आहे, जिथे मुंबईचे खूप सुंदर दृश्य दिसते. विरुष्काच्या घरात वुडन फ्लोअरिंग करण्यात आले असून संपूर्ण घर लाकडी फर्निचरने सजवण्यात आले आहे.