Rohit Sharma: सुपर ओव्हरमध्ये मोहम्मद नबीने केली चिटींग? खेळाडूच्या कृत्यावर रोहित शर्मा संतापला

Rohit Sharma:  अखेरीस टीम इंडियाने अफगाणिस्तानवर विजय मिळवला. मात्र या सामन्यात अफगाणिस्तानचा खेळाडू मोहम्मद नबी ( Mohammad Nabi ) च्या एका कृत्यावर रोहित शर्मा संतापल्याचं दिसून आलं. 

सुरभि जगदीश | Updated: Jan 18, 2024, 10:29 AM IST
Rohit Sharma: सुपर ओव्हरमध्ये मोहम्मद नबीने केली चिटींग? खेळाडूच्या कृत्यावर रोहित शर्मा संतापला title=

Rohit Sharma: भारत विरूद्ध अफगाणिस्तान यांच्यात 3 सामन्यांची टी-20 सिरीज खेळवण्यात आली होती. या सिरीजमधील शेवटचा सामना बंगळूरूच्या चिन्नस्वामी स्टेडियममध्ये खेळवण्यात आला. या सिरीजमधील शेवटच्या सामन्यात अनेक आश्चर्यकारक गोष्टी घडल्या. क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदा टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये दोन सुपर ओव्हर खेळवण्यात आल्या. अखेरीस टीम इंडियाने अफगाणिस्तानवर विजय मिळवला. मात्र या सामन्यात अफगाणिस्तानचा खेळाडू मोहम्मद नबी ( Mohammad Nabi ) च्या एका कृत्यावर रोहित शर्मा संतापल्याचं दिसून आलं. 

तिसऱ्या टी-20 सामन्यातील पहिल्या सुपर ओव्हरमध्ये अफगाणिस्तानच्या टीमने 16 रन्स केले. यावेळी मोहम्मद नबीने शेवटच्या बॉलवर ओव्हर थ्रोसाठी 3 रन्स काढले. यावेळी टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा आणि मोहम्मद नबी (Mohammad Nabi) मध्ये बाचाबाची झाल्याचं दिसून आलं. 

ओव्हर थ्रोवर रन घेतल्यावरून संतापला रोहित शर्मा 

भारत आणि अफगाणिस्तान (IND vs AFG) यांच्यात झालेल्या सामन्यात रोमांचक गोष्टी घडल्या. चेन्नईत खेळल्या गेलेल्या शेवटच्या सामन्यात 212 रन्सच्या लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या अफगाणिस्तान टीमला 6 गडी गमावून केवळ 212 धावा करता आल्या. मात्र सामना बरोबरीत सुटला. त्यानंतर पहिली सुपर ओव्हर खेळवण्यात आली. ज्यामध्ये अफगाणिस्तानने 16 रन्स केल्या.

यादरम्यान ओव्हर थ्रो झालेल्या शेवटच्या बॉलवर मोहम्मद नबीने 3 रन्स घेतले. यावेळी बॉल त्याच्या शरीराला स्पर्श करून दुसऱ्या दिशेने गेला होता. या कृत्यावर भारतीय कर्णधार रोहित शर्मा खूपच नाराज दिसत होता. विराट कोहलीनेही थ्रो करताना हातवारे करत बॉल नबीच्या मांडीला लागल्याचं सांगितलं. रोहितनेही याबाबत तक्रार केली, ज्यावर नबी म्हणाला की, मी हे जाणूनबुजून केलं नाही. त्यानंतर दोन्ही खेळाडूंमध्ये काही वेळ वाद झाल्याचं दिसून आलं.

या सामन्यात पहिली सुपर ओव्हरही टाय होईल अशी कोणी अपेक्षाही केली नव्हती. अफगाणिस्तानने पहिल्या सुपर ओव्हरमध्ये 16 रन्स केले होते. या लक्ष्याचा पाठलाग करताना टीम इंडियाला रोहित शर्माच्या निवृत्तीनंतर 1 विकेट गमावून 16 रन्स करता आले. अशा प्रकारे चाहत्यांना पुन्हा एकदा सुपर ओव्हरमध्ये टाय झालेला सामना पाहायला मिळाला.

अखेर टीम इंडियाचा विजय

दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये फलंदाजीसाठी आलेल्या टीम इंडियाने 11 रन्स केले होते. या लक्ष्य सहज गाठणं शक्य होतं पण रोहित शर्माने रवी बिश्नोईवर विश्वास दाखवला. ज्याने आपली फिरकी दाखवत दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये दोन विकेट्स घेत अफगाणिस्तानचा डाव संपवला. अखेर दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये भारताने 10 रन्सने सामना जिंकला.