NZ vs SA : क्रिकेटच्या सामन्यात नवा 'बॅडमिंटन शॉट', Devon Conway चा हिट पाहून डिव्हिलियर्सला विसराल; पाहा Video

NZ vs SA, Cricket Video : न्यूझीलंडकडून सर्वात आक्रमक खेळी कॉन्वेने केली होती. या सामन्याच्या 17 व्या ओव्हरमध्ये कॉन्वेच्या नव्या शॉटने (Devon Conway Batminton shot) डोकं वर काढलं. त्यामुळे सर्वांना आश्चर्याचा धक्का बसलाय.

Updated: Oct 2, 2023, 06:26 PM IST
NZ vs SA : क्रिकेटच्या सामन्यात नवा 'बॅडमिंटन शॉट', Devon Conway चा हिट पाहून डिव्हिलियर्सला विसराल; पाहा Video title=
Devon Conway, Batminton shot, Cricket Video

Devon Conway Batminton shot : वर्ल्ड कपआधी दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड (NZ vs SA) यांच्यातील सराव सामना तिरुअनंतपुरमच्या ग्रीनफिल्ड इंटरनॅशनल स्टेडियमवर खेळला जात आहे. न्यूझीलंडने (New Zealand) टॉस जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला अन् न्यूझीलंडने आक्रमक खेळी करत सर्व संघांना सतर्क राहण्याचे संकेत दिले आहेत. न्यूझीलंड आणि साऊथ अफ्रिका (South Africa) या दोन्ही संघांनी वेगवेगळे प्रयोग करत वर्ल्ड कपसाठी फुंकार मारली आहे. या सामन्यात डेव्हॉन कॉन्वेने (Devon Conway) साऊथ अफ्रिकेची फलंदाजी फोडून काढली. त्यावेळी त्याने खेळलेल्या एका शॉटची चर्चा होताना दिसत आहे.

डेव्हॉन कॉनवे आणि विल यंग यांनी न्यूझीलंडच्या डावाची सुरुवात केली होती. यंग आऊट झाल्यानंतर केन विल्यम्सन अन् टॉम लिथम यांच्यासह कॉन्वे याने 73 चेंडूत 78 धावांची खेळी केली. त्यावेळी त्याने 11 फोर अन् एक गगनचुंबी षटकार देखील खेचला. न्यूझीलंडकडून सर्वात आक्रमक खेळी कॉन्वेने केली होती. या सामन्याच्या 17 व्या ओव्हरमध्ये कॉन्वेच्या नव्या शॉटने डोकं वर काढलं. त्यामुळे सर्वांना आश्चर्याचा धक्का बसलाय.

सामन्याच्या 17 व्या ओव्हरमध्ये न्यूझीलंडने 86 धावा केल्या होत्या. त्यावेळी स्विप शॉट खेळण्याच्या नादात कॉन्वेने नवा बॅडमिंटन शॉट खेळला. त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. सोशल मीडियावर या नव्य़ा शॉटला 'बॅडमिंटन शॉट' या (Batminton shot) नावाने ओळख मिळाली आहे.

पाहा Video

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by ICC (@icc)

दरम्यान, न्यूझीलंडने 29 सप्टेंबर रोजी हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर पहिला सराव सामना खेळला. त्या सामन्यात न्यूझीलंडने पाकिस्तानचा 5 गडी राखून पराभव केला होता. आता दक्षिण आफ्रिकेसमोर न्यूझीलंडने भलामोठा डोंगर उभारला आहे.

वर्ल्ड कपसाठी टीम

न्यूझीलंड : केन विलियमसन (कॅप्टन), ट्रेंट बोल्ट, मार्क चॅपमैन, डेवोन कॉनवे, लॉकी फर्ग्यूसन, मॅट हेनरी, टॉम लॅथम, डेरिल मिशेल, जिमी नीशम, ग्लेन फिलिप्स, रचिन रवींद्र, मिचेल सेंटनर, ईश सोढ़ी, टिम साउदी, विल यंग.

साउथ अफ्रीका : तेम्बा बावुमा (कॅप्टन), गेराल्ड कोएत्ज़ी, क्विंटन डी कॉक, रीज़ा हेंड्रिक्स, मार्को जानसन, हेनरिक क्लासेन, केशव महाराज, एडेन मार्कराम, डेविड मिलर, लुंगी एनगिडी, एंडिले फेहलुकवायो, कगिसो रबाडा, तबरेज़ शम्सी, रासी वैन डेर डुसेन, लिजाड विलियम्स.