सलग दोन विजयाची दिल्लीच्या खेळाडूंच्या डोक्यात हवा, भर पार्टीत महिलेबरोबर... फ्रेंचायझीने घेतली गंभीर दखल

Delhi Capitals : दुसरीकडे ऑफ द फिल्ड दिल्ली कॅपिटल्सच्या एका खेळाडूवर गंभीर आरोप लावण्यात आले आहेत. यावेळी दिल्ली कॅपिटल्सच्या फ्रेंचायझीने टीमच्या खेळाडूंसाठी कठोर निर्बंध (Strict restrictions for team players) लागू केलेत. 

Updated: Apr 27, 2023, 06:47 PM IST
सलग दोन विजयाची दिल्लीच्या खेळाडूंच्या डोक्यात हवा, भर पार्टीत महिलेबरोबर... फ्रेंचायझीने घेतली गंभीर दखल title=

Delhi Capitals : यंदाच्या आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्सची (Delhi Capitals) सुरुवात काही फारशी चांगली झालेली नाही. 7 सामन्यांमध्ये दिल्लीच्या (Delhi Capitals) टीमला केवळ 2 सामने जिंकता आले आहेत. तर दुसरीकडे ऑफ द फिल्ड दिल्ली कॅपिटल्सच्या एका खेळाडूवर गंभीर आरोप लावण्यात आले आहेत. यावेळी दिल्ली कॅपिटल्सच्या फ्रेंचायझीने टीमच्या खेळाडूंसाठी कठोर निर्बंध (Strict restrictions for team players) लागू केलेत. 

मिळालेल्या माहितीनुसार, दिल्लीच्या एका खेळाडूने पार्टीमध्ये महिलेशी अश्लील आणि गैरवर्तणूक केली. त्यामुळे फ्रेंचायझींनी हे कडक नियम लागू करण्याचा निर्णय घेतलाय. या नियमांनुसार खेळाडूंना आता हॉटेल सोडण्यापूर्वी फ्रेंचायझी अधिकाऱ्याला कळवावं लागेल. इतकंच नाही तर रात्री 10 वाजल्यानंतर खेळाडूंना हॉटेलच्या खोलीमध्ये कोणत्याही पाहुण्याला किंवा ओळखीच्या व्यक्तीला आणण्याची परवानगी दिली गेलेली नाहीये.

गैरवर्तणूक करणाऱ्या खेळाडूच्या नावाचा खुलासा नाही

नुकतंच दिल्ली कॅपिटल्सच्या टीमने सनरायझर्स हैदराबादच्या टीमचा पराभव केला. हैदराबादच्या विजयानंतर एक पार्टी झाली आणि या पार्टीमध्ये एका स्टार खेळाडूने पार्टीमध्ये महिलेसोबत अश्लील वर्तन केल्याचं समोर आलं आहे. दरम्यान हा खेळाडू कोण आहे याचा खुलासा करण्यात आलेला नाही. जर फ्रेंचायझींनी दिलेल्या नियमांचं पालन केलं गेलं नाही तर संबंधित खेळाडूवर कडक कारवाई करण्यात येईल. यामध्ये खेळाडूचं कॉन्ट्रॅक्टही रद्द केलं जाऊ शकतं.

यावेळी दिल्ली कॅपिटल्सच्या फ्रँचायझीने गाईडलाईन्स देखील जारी केल्यात. यामध्ये, टीमच्या प्रत्येक खेळाडूला फ्रेंचायझीच्या कार्यक्रमांमध्ये सहभागी होणं बंधनकारक असणार असल्याचं म्हटलंय. मात्र यामध्ये कोणत्याची एका घटनेचा उल्लेख केलेलना नाहीये. यामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा मांडण्यात आलाय तो म्हणजे, खेळाडूंना रात्री 10 नंतर त्यांच्या हॉटेलच्या खोल्यांमध्ये पाहुण्यांना आणण्याची परवानगी दिली जाणार नाही. ते हॉटेलच्या कॉमन एरिया किंवा कॅफेटेरियामध्ये त्यांना भेटायला आलेल्या व्यक्तींची भेट घेऊ शकतात.

पुढचा सामना रंगणार हैदराबादसोबत

दिल्लीच्या टीमचा खेळ या सामन्यामध्ये फारच वाईट झालेला दिसून येतोय. दिल्लीची पुढची मॅच हैदराबादसोबत असून टीमसाठी ही करो किंवा मरोची स्थिती आहे. कारण दिल्ली कॅपिटल्सच्या टीमला आता यापुढील सर्व सामने जिंकावे लागणार आहेत.