डेव्हिड वॉर्नरनं बनवून घेतलं आधारकार्ड? फोटो होतोय व्हायरल; तुम्ही पाहिलात का?

David Warner Aadhar Card : डेव्हिड वॉर्नरनं बनवलं आधारकार्ड सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल. तुम्ही पाहिलंत का डेव्हिडचं आधार कार्ड?

दिक्षा पाटील | Updated: Oct 25, 2023, 01:36 PM IST
डेव्हिड वॉर्नरनं बनवून घेतलं आधारकार्ड? फोटो होतोय व्हायरल; तुम्ही पाहिलात का? title=
(Photo Credit : Social Media)

David Warner Aadhar Card : ऑस्ट्रेलियाचा  स्फोटक फलंदाज डेव्हिड वॉर्नर हा नेहमीच त्याच्या हटके स्टाईलसाठी ओळखला जातो. डेव्हिड वॉर्नरचे भारतावर असलेले प्रेम सगळ्यांनाच ठावूक आहे. कोणताही सणं असो किंवा मग भारतासाठी असलेला खास दिवस डेव्हिड आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देण्यासाठी सगळ्यात पुढे असतो. डेव्हिड वॉर्नर हा दिल्ली डेअरडेव्हल्सच्या संघाकडून इंडियन प्रमिअर लिगमध्ये खेळतो. त्यामुळे त्याचं भारतात येणं जाणं हे सतत असतं. आता त्याचा एक व्हिडीओ व्हायरल होत असून डेव्हिड वॉर्नरनं त्याचं आधारकार्ड बनवल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. 

डेव्हिड वॉर्नरचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तानमध्ये सामना सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. त्याचवेळी बॅकग्राऊंडला श्रीवल्ली गाणं सुरु असून त्यावर डेव्हिड वॉर्नर गाण्याची हूक स्टेप करताना दिसत आहे. दुसरीकडे व्हिडीओच्या वरती एक आधार कार्ड असून त्यावर 'नाव- डेव्हिड वॉर्नर, पुढे जन्म तारिख पासून त्याचा आधार नंबर देखील आहे. तर खाली आधार- आदमी का अधिकार' असं म्हटलं आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून डेव्हिड वॉर्नरनं स्वत: चं आधार कार्ड बनवल्याची कमेंट अनेकांनी केली आहे. काही नेटकऱ्यांनी डेव्हिड वॉर्नरची स्तुती केली आहे. इतकंच नाही तर डेव्हिडनं त्याची सेन्च्युरी केल्यानंतर देखील 'पुष्पा' स्टाईलमध्ये सेलिब्रेशन केलं होतं. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

नेटकरी डेव्हिडची स्तुती करत कमेंटचा वर्षाव करताना दिसत आहेत. एक नेटकरी म्हणाला, 'हे पाहून त्याचं भारतावर असलेलं प्रेम दिसत आहे.' दुसरा नेटकरी मजेशीर कमेंट करत म्हणाला की 'पॅन कार्डपण बनवून घे टॅक्सपण घेतील.' तिसरा नेटकरी म्हणाला, 'नाचता नाचता डेव्हिडनं पुष्पा स्टाईलमध्ये पाकिस्तानला हरवलं आहे.' आणखी एक नेटकरी म्हणाला, 'वॉर्नर हा भारतीयचं आहे, चुकून ऑस्ट्रेलियात जन्माला आला.' 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

हेही वाचा : 'भाड में जा...', सलमानच्या भेटीविषयी असं का म्हणाला अशनीर ग्रोव्हरनं?

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

दरम्यान, हे खरंच आहे की डेव्हिडचं भारतावर खूप प्रेम आहे. हे खरं आहे की नाही हे जाणून घेण्यासाठी एखाद्यानं त्याचं इन्स्टाग्राम अकाऊंट पहावं. व्हिड वॉर्नर भारताला स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा देणारी पोस्ट केली होती. तर डेव्हिडने भारताच्या चांद्रयान मोहिमेच्या यशानंतर शुभेच्छा देणारी पोस्टही शेअर केली होती. गेल्या वर्षी त्यानं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत भारतीयांना गणेशोत्सवाची शुभेच्छा दिली होती. त्याशिवाय त्याचे रंगपंचमी खेळतानाचे फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.  भारत दौऱ्यावर आल्यावर डेव्हिड हा त्याच्या कुटुंबासोबत अनेक पर्यटक स्थळांना भेट देतो. काही दिवसांपूर्वी डेव्हिडनं विमानतळावरील एका जवानासोबत सेल्फी शेअर केली होती. ही सेल्फी शेअर करत त्यानं "भारतात पुन्हा पुन्हा होणारं स्वागत हे भारावून टाकणारं आहे. आमची कायमच इथे काळजी घेतली जाते आणि सुरक्षित वाटतं. विमानतळावरुन नेहमीच आमचा प्रवेश सुखकर करुन दिला जातो त्यासाठी धन्यवाद."