CSK Vs GT Final : आयपीएलच्या ( IPL 2023 ) इतिहासात पहिल्यांदाच असं घडणार आहे की, राखीव दिवस म्हणजे रिझर्व्ह डेच्या ( IPL 2023 Final On Reserve day ) दिवशी स्पर्धेची फायनल रंगणार आहे. रविवारी पाऊस पडल्यामुळे सामना होऊ शकला नाही. तर आजच्या दिवशीही पावसाची शक्यता वर्तवण्यात येतेय. नरेंद्र मोदी स्टेडियमवर ( Narendra Modi Stadium ) पावसाने थोडी जरी उसंत घेतली असती तर ग्राऊंड्समननी अवघ्या अर्ध्या तासात खेळण्यासाठी तयार केलं असतं.
आता तुम्हाला प्रश्न पडेल हे कसं? तर अहमदाबादमधील मोटेरा स्टेडियमचं पुनर्निर्माण झालंय. हे स्टेडियम जगातील सर्वात मोठं क्रिकेट स्टेडियम असून याठिकाणी ड्रेनेज व्यवस्था देखील अद्यावत करण्यात आली आहे.
मोठ्या पावसानंतर देखील हे स्टेडियम लवकरात लवकर खेळण्यायोग्य होऊ शकतं. यावेळी मैदान कोरडं करण्यासाठी ग्राऊंड्समन्सना 30 मिनिटांपेक्षा अधिक वेळ लागत नाही. त्यामुळे या मैदानावर जरी 8 सेंटीमीटर इतका पाऊस झाला तरीही खेळ 30 मिनिटात सुरू करता येतो.
हे करण्यासाठी अद्ययावर सुविधा प्रदान करण्यात आली आहे. यामध्ये मैदानाची खेळपट्टी आणि गवताच्या खाली वाळूचा एक थर पसरवण्यात आलाय. त्यामुळे इतर स्टेडियमपेक्षा पाणी अधिक वेगाने शोषून घेण्यात येतं. अशावेळी त्यामुळे मोठ्या पावसानंतरही स्टेडियमवर सामना लवकर सुरू करण्यास फार वेळ लागत नाही.
अहमदाबादच्या मोदी स्टेडियमवर अखेर पावसाने उसंत घेतली आहे. यामुळे आता सामन्याला सुरुवात झालेली आहे. टॉस झाला असून फायनलमध्ये चेन्नई सुपर किंग्जने टॉस जिंकला आहे. या सामन्यात गुजरात टायटन्स प्रथम फलंदाजी करणार आहे. दरम्यान यावेळी दोन्ही कर्णधारांनी टीममध्ये कोणताही बदल केलेला नाही.
गुजरात टायटन्स: ऋद्धिमान साहा (विकेटकीपर), शुभमन गिल, साई सुदर्शन, हार्दिक पांड्या (कर्णधार), विजय शंकर, डेविड मिलर, राहुल तेवतिया, राशिद खान, मोहित शर्मा, नूर अहमद, मोहम्मद शमी
चेन्नई सुपर किंग्स: ऋतुराज गायकवाड़, डेवोन कॉनवे, अजिंक्य रहाणे, मोइन अली, अंबाती रायडू, रवींद्र जडेजा, एमएस धोनी (कर्णधार/विकेटकीपर), दीपक चाहर, मथीशा पथिराना, तुषार देशपांडे, महेश तीक्षणा