IPL 2023 Final: 'वडिलांच्या गळ्यात हात टाकता का?', Sunil Gavaskar यांची हार्दिक पांड्यावर सडकून टीका!

IPL 2023 Final  CSK vs GT Reserve Day: माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर (Sunil Gavaskar) यांनी गुजरात टायटन्सचा कर्णधार हार्दिक पांड्या (Hardik Pandya) याच्यावर सडकून टीका केली आहे.

Updated: May 29, 2023, 07:28 PM IST
IPL 2023 Final: 'वडिलांच्या गळ्यात हात टाकता का?', Sunil Gavaskar यांची हार्दिक पांड्यावर सडकून टीका! title=
Sunil Gavaskar,Hardik Pandya

Sunil Gavaskar On Hardik Pandya:  आयपीएल 2023 फायनलचा रंगतदार सामना (IPL 2023 Final) गुजरात टायटन्स विरुध चेन्नई सुपर किंग्स या दोन संघात रंगणार आहे. हा सामना रविवारी 28 मे रोजी होणार होता परंतु अहमदाबादमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे हा सामना 29 मे म्हणजे सोमवारी (Reserve Day) होईल असं निश्चित झालं. यंदाचा सामना कोण जिंकणार? धोनीची चेन्नई की हार्दिकची गुजरात? असा सवाल विचारला जात आहे. अशातच आता माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर (Sunil Gavaskar) यांनी गुजरात टायटन्सचा कर्णधार हार्दिक पांड्या (Hardik Pandya) याच्यावर सडकून टीका केली आहे.

नेमकं काय झालं?

अहमदाबादमध्ये मुसळधार पावसामुळे (Ahmadabad Rain) आता हा सामना 29 मे रोजी खेळला जातोय. या वेळेस हार्दिक आणि धोनीचे फोटो दाखवण्यात आले. त्यावेळी सुनील गावस्कर समालोचन करत होते. त्यावेळी एक फोटो झळकला. यामध्ये हार्दिकने धोनीच्या खांद्यावर हात टाकला होता. त्यावर गावस्कर यांनी नाराजी व्यक्त केली आणि हार्दिक पांड्यावर टीका केलीये.

आणखी वाचा - Anand Mahindra: IPL Final मध्ये कोणता संघ जिंकणार? CSK की GT? आनंद महिंद्रा म्हणतात...

धोनी आणि हार्दिक निश्चित चांगले मित्र असतील पण, धोनी महान खेळाडू आहे. हार्दिकने त्याला थोडा सन्मान द्यायला हवा. हार्दिकचे त्याच्या गळ्यात हात टाकणे शोभत नाही, असं मत सुनील गावस्कर यांनी म्हटलं आहे. तुम्ही वडिलांच्या काकांच्या गळ्यात असा हात टाकता का? असा परखड सवाल देखील त्यांनी यावेळी विचारला. मला ही गोष्ट थोडीशी खटकते, असं म्हणत त्यांनी थेट नाराजी व्यक्त केलीये.

हार्दिकचा संघ गुजरात टायटन्स हा आयपीएल 2023 चा सर्वोत्कृष्ट संघ आहे. आयपीएलमध्ये 14 सामन्यांमध्ये केवळ 4 पराभव स्विकारावे लागलेत आणि गुणतालिकेत शीर्षस्थानी आहेत आणि आयपीएलच्या अंतिम सामन्यात त्यांचा सामना चेन्नईशी होणार आहे. त्यामुळे यंदा देखील डिफेन्डिंग चॅम्पियन आयपीएलचा कप जिंकणार का? असा सवाल विचारला जातोय.