ईशान किशनसाठी गुड न्यूज, थेट कर्णधारपदाची लॉटरी... आता नशीब पालटणार?

Isshan Kishan : क्रिकेटर ईशान किशन गेल्या अनेक महिन्यांपासून टीम इंडियातून दूर आहे. पण आता ईशान किशनसाठी एक गुड न्यूज आली आहे. झारखंड क्रिकेट असोसिएशनने आगामी रणजी ट्रॉफीसाठी ईशान किशनची कर्णधारपदाची नियुक्ती केली आहे. 

राजीव कासले | Updated: Oct 9, 2024, 06:22 PM IST
ईशान किशनसाठी गुड न्यूज, थेट कर्णधारपदाची लॉटरी... आता नशीब पालटणार? title=

Ishan Kishan : क्रिकेटर ईशान किशन गेल्या अनेक महिन्यांपासून टीम इंडियातून दूर आहे. पण आता ईशान किशनसाठी (Ishan Kishan) एक गुड न्यूज आली आहे. झारखंड क्रिकेट असोसिएशनने आगामी रणजी ट्रॉफीसाठी ईशान किशनची कर्णधारपदाची नियुक्ती केली आहे. झारखंड राज्य क्रिकेट असोसिएशनने (JSCA) बुधवारी 2024-25 रणजी हंगामासाठी झारखंड संघाची घोषणा केली. ईशान किशनशिवाय संघात अनेक युवा खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. 

स्थानिक क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी
ईशान किशिनने स्थानिक क्रिकेटमध्ये (Domestic Cricket) दमदार कामगिरी केली आहे. बूची बाबू क्रिकेट स्पर्धेत ईशान किशनकडे झारखंड संघाचं कर्णधारपद सोपवण्यात आलं होतं. या स्पर्धेत त्याने शानदार कामगिरी करत बीसीसीआयचं लक्ष्य वेधून घेतलं. त्यानंतर गेल्या महिन्यात झालेल्या दुलिप ट्रॉफीतही भारत सी संघाकडून खेळताना त्याने खणखणीत शतक ठोकलं होतं. इराणी कपमध्ये ईशानने रेस्ट ऑफ इंडियाचं प्रतिनिधित्व केलं. मुंबईविरुद्धच्या या सामन्यात ईशानने 38 धावांची खेळी केली होती. आता ईशान किशनकडे 16 खेळाडूंच्या झारखंड संघाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. 

11 ऑक्टोबरपासून रणजी हंगामाला सुरुवात
रणजी ट्रॉफीचा नवा हंगाम येत्या 11 ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे. या स्पर्धेत झारखंड क्रिकेट संघाचा पहिला सामना आसामविरुद्ध होणार आहे. झारखंडचा संघ असलेल्या एलिट ग्रुपमध्ये आसाम, रेल्वे, चंदीगड, छत्तीसगड, सौराष्ट्र, दिल्ली आणि तामिळनाडू संघांचा समावेश आहे. 

ईशानचं टीम इंडियात पुनरागमन होणार?
ईशान किशनने टीम इंडियासाठी शेवटचा दक्षिण आफ्रिका दौरा केला होता. मानसिक तणावामुळे ईशान किशनने या दौऱ्यातून माघार घेतली आणि तेव्हापासून ईशान किशन टीम इंडियातून बाहेर आहे. यानंतर त्याला बीसीसीआयने सेंट्रल कॉन्ट्रॅक्टमधून बाहेर केलं. पण आता रणजी ट्रॉफीत चांगली कामगिरी करत टीम इंडियात पुनरागमन करण्याची ईशान किशनकडे चांगली संधी आहे. 

अंडर-19चाही होता कर्णधार
ईशान किशन हा मूळचा बिहारचा आहे. पण तो झारखंडसाठी खेळतो. 22 डिसेंबबर 2015 मध्ये अंडर-19 क्रिकेट वर्ल्ड कपसाठी ईशान किशनवर भारतीय क्रिकेट संघाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. याशिवाय ईशान 2019 पासून इंडियन प्रीमिअर लीगमध्ये मुंबई इंडियन्सचं प्रतिनिधित्व करतोय. 

रणजी ट्रॉफीसाठी झारखंडचा संघ
ईशान किशन (कर्णधार), विराट सिंह (उप कर्णधार), कुमार कुशाग्र (विकेटकीपर), नाजिम सिद्दीकी, आर्यमन सेन, शरणदीप सिंह, कुमार सूरज, अनुकूल रॉय, उत्कर्ष सिंह, सुप्रियो चक्रवर्ती, सौरभ शेखर, विकास कुमार, विवेकानंद तिवारी, मनीषी, रवि कुमार यादव, रौनक कुमार