टीम इंडियात 'सुनील नरेन'ची एन्ट्री, श्रीलंकाविरुद्धच्या मालिकेत गौतम गंभीरची जबरदस्त चाल

India vs Sri Lanka T20 Series : श्रीलंका दौऱ्यापासून टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक म्हणून कार्यकाळ सुरु करणाऱ्या गौतम गंभीरने भारतीय क्रिकेट संघासाठी जबरदस्त प्लान तयार केला आहे. पल्लेकेलेतल्या पहिल्या टी20 सामन्यासाठी गौतम गंभीरने चक्क सुनील नरेनची मदत घेतली आहे. 

राजीव कासले | Updated: Jul 25, 2024, 06:59 PM IST
टीम इंडियात 'सुनील नरेन'ची एन्ट्री, श्रीलंकाविरुद्धच्या मालिकेत गौतम गंभीरची जबरदस्त चाल title=

India vs Sri Lanka T20 Series :  श्रीलंका दौऱ्यापासून टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक म्हणून कार्यकाळ सुरु करणाऱ्या गौतम गंभीरने (Gautam Gambhir) भारतीय क्रिकेट संघासाठी (Team India) जबरदस्त प्लान तयार केला आहे. आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा (KKR) मेंटोर असताना गौतम गंभीरने जो मंत्र केकेआरच्या खेळाडूंना दिला होता. तोच मंत्र आता श्रीलंका दौऱ्यात अंमलात आणला जाणार आहे. या मंत्रामुळे कोलकाता नाईट रायडर्सने आयपीएलच्या सतराव्या हंगामाचं जेतेपद पटकावलं होतं. हा मंत्र होता 'मैदानावर जा आणि गोलंदाजावर हल्लाबोल करा, चौकार-षटकारांची बरसात करा, पॉवर प्लेमध्येच विरोधी संघाला नेस्तनाबूत करा'

टीम इंडियात सुनील नरेनची एन्ट्री
आयपीएलच्या सतराव्या हंगामात कोलकाता नाईट रायडर्ससाठी गौतम गंभीरच्या या फॉर्म्युल्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी होती ती वेस्ट इंडिजचा ऑलराऊंडर सुनील नरेनवरं (Sunil Narine). सलामीला येऊन सुनील नरेन तुफान फटेकाबाजी करत विरोधी संघांच्या गोलंदाजांची पिसं काढत होता. आता श्रीलंका दौऱ्यासाठी गौतम गंभीरने असाच एक सुनील नरेन शोधून काढला आहे. जो मैदानावर उतरताच थेट चौकार-षटकारांची बरसात करेल. या खेळाडूचं नाव आहे वॉशिंग्टन सुंदर (Washington Sunder). टीम इंडियात वॉशिंग्टन सुंदर सुनील नरेनची भूमिका पार पाडताना दिसणार आहे. 

टीम इंडियाचा सुनील नरेन
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पल्लेकेलेच्या पहिल्या टी20 सामन्यात गौतम गंभीरने वॉशिंग्टन सुंदरकडे हिंटिंगचा रोल दिला आहे. सरावावेळी वॉशिंग्टन सुंदरकडून नंबर तीनवर फलंदाजी करुन घेण्यात आली. फलंदाजीदरम्यन वॉशिंग्टनने मोठे फटके खेळण्याचा सराव केला. म्हणजे त्याला केवळ चौकार-षटकारांवर लक्ष केंद्रीत करण्यास सांगण्यात आलं. विशेष म्हणजे वॉशिंग्टन सुंदरही सुनील नरेनसारखाच उजव्या हाताने फलंदाजी करतो. तसंच सुनील नरेनसारखाच गोलंदाजी करण्यात तरबेज आहे. 

गंभीरची दमदार प्लॅनिंग
गौतम गंभीरची ही प्लॅनिंग यशस्वी झाली तर टीम इंडियाला पॉवर प्लेमध्येच चांगली सुरुवात मिळू शकते.  24 वर्षांच्या वॉशिंग्टनने टी20, एकदिवसीय आणि कसोटी फॉर्मेटमध्ये अर्धशतकी खेळी केली आहे. रांची गेल्या वर्षी न्यूझीलंडविरुद्धच्या टी20 सामन्यात वॉशिंग्टन सुंदरने अवघ्या 26 चेंडूत 50 धावांची आक्रमक फलंदाजी केली होती. तशाच फलंदाजीची अपेक्षा श्रीलंकेविरुद्धच्या मालेकत वॉशिंग्टन सुंदरकडून अपेक्षीत आहे. वॉशिंग्टन सुंदरला तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला पाठवल्यास, ऋषभ पंतला खालच्या क्रमांकावर फलंदाजीला उतरावं लागेल. आात गौतम गंभीरचा हा प्लान किती यशस्वी ठरतो हे लवकरच स्पष्ट होईल.