Team India Future Captain : श्रीलंका दौऱ्यासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) टीम इंडियाची (Team India) घोषणा केली. श्रीलंका दौऱ्यात भारत आणि श्रीलंकेदरम्यान तीन टी20 आणि तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळणार आहे. बीसीसीआयने टी20 आणि एकदिवसीय मालिकेसाठी दोन वेगवेगळे संघ निवडले आहेत. टी20 संघाच्या कर्णधारपदी हार्दिक पांड्याचं जवळपास निश्चित झालं असताना बीसीसीआयने सूर्यकुमार यादवची निवड करुन सर्वांनाच धक्का दिला. तर एकदिवसीय मालिकेसाठी रोहित शर्माकडेच कर्णधारपद कायम ठेवण्यात आलं आहे.
टीम इंडियाचा भविष्यातील कर्णधार
एकीकडे टी20 संघाच्या कर्णधारपदावरुन चर्चा सुरु असतानाच बीसीसीआयने युवा खेळाडू शुभमन गिलवर (Shubman Gill) मोठी जबाबादारी सोपवली. टीम इंडियाचे नवे प्रशिक्षक गौतम गंभीरच्या मार्गदर्शनाखाली गिलला पदोन्नती देण्यात आली आहे. श्रीलंका दौऱ्यात टी20 आणि एकदिवसीय मालिकेसाठी शुभमन गिल टीम इंडियाचा उपकर्णधार असणार आहे. टी20 संघात हार्दिक पांड्या आणि ऋषभ पंतला तर एकदिवसीय संघात अनुभवी के एल राहुलला डावलून बीसीसीआयच्या निवड समितीने शुभमन गिलकडे उपकर्णधारपदाची जबाबदारी सोपवली आहे.
बीसीसीआयची दूरदृष्टी
शुभमन गिलला उपकर्णधार निवडण्यामागे बीसीसीआयची दूरदृष्टी असल्याचं बोललं जात आहे. शुभमन गिल रोहित शर्माचं उत्तराधिकारी असणार असे स्पष्ट संकेतच यानिमित्ताने बीसीसीआयने दिले आहेत. झिम्बाब्वे दौऱ्यातही शुभमन गिलने टीम इंडियाचं नेतृत्व केलं होतं. या दौऱ्यात टीम इंडियाने झिम्बाबेवर 4-1 अशी मात केली होती.
शुभमन गिलला उपकर्णधार बनवण्यामागे आणखी एक मोठं कारण म्हणजे वय. कर्णधार रोहित शर्मा 37 वर्षांचा आहे. टी20 चा नवा कर्णधार सूर्यकुमार यादव 33 वर्षांचा आहे. तर या तुलनेत शुभमन गिल अवघ्या 24 वर्षांचा आहे. त्यामुळे गिलकडे कर्णधार म्हमऊन परिपक्क होण्यासाठी बराच वेळ आहे. रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादव नंतर टीम इंडियाचा भविष्यातील कर्णधार म्हणून शुभमन गिलकडे पाहिलं जात आहे.
पांड्या-पंतचं काय?
हार्दिक पांड्या, ऋषभ पंत सारखे अनुभवी खेळाडू असताना शुभमन गिलकडे उपकर्णधारपद का सोपवण्यात आलं असा प्रश्न उपस्थित झाला आहे. यामागे मुख्य कारण आहे ते म्हणजे दोन्ही खेळाडूंचा फिटनेस. ऋषभ पंत अपघातानंतर मैदानावर परतला आहे. तर पंड्याच्या फिटनेसवर वारंवार प्रश्न उपस्थित करण्यात आलाय. यावर पर्याय म्हणून शुभमन गिलचं नाव समोर आलं. पांड्या आणि पंतच्या तुलनेत गिलचं पारडं जड आहे. आयपीएलमध्येही शुभमन गिल गुजरासृत टायटन्सचं कर्णधारपद सांभाळतोय.
श्रीलंका दौऱ्यात भारताचा टी20 संघ
सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), यशस्वी जायसवाल, रिंकू सिंह, रियान पराग, ऋषभ पंत (विकेटकीपर), संजू सॅमसन (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, वॉशिंगटन सुंदर, रवि बिश्नोई, अर्शदीप सिंह, खलील अहमद, मोहम्मद सिराज.
श्रीलंका दौऱ्यात भारताचा एकदिवसीय संघ
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), विराट कोहली, केएल राहुल (विकेटकीपर), ऋषभ पंत (विकेटकीपर), श्रेयस अय्यर, शिवम दुबे, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, वॉशिंगटन सुंदर, अर्शदीप सिंह, रियान पराग, अक्षर पटेल, खलील अहमद, हर्षित राणा.
भारत-श्रीलंका मालिकेचं वेळापत्रक
27 जुलै - पहिला टी20, पल्लेकेल
28 जुलै - दूसरा टी20, पल्लेकेल
30 जुलै - तिसरा टी20, पल्लेकेल
2 ऑगस्ट - पहिली वनडे, कोलंबो
4 ऑगस्ट- दूसरी वनडे, कोलंबो
7 ऑगस्ट- तिसरी वनडे, कोलंबो