Team India : भारत-ऑस्ट्रेलिया टी20 मालिकेनंतर भारती क्रिकेट संघ दक्षिण आफ्रिकेच्या (India Tour of South Africa) मोठ्या दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात टीम इंडिया तीन एकदिवसीय, तीन टी20 आणि दोन कसोटी सामने खेळणार आहे. यासाठी भारतीय निवड समितीने संघाची घोषणा केली आहे. या दौऱ्याचं वैशिष्ट्य म्हणजे तीन्ही फॉर्मेटमध्ये वेगवेगळे कर्णधार आहेत. तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी केएल राहुलकडे (KL Rahul) धुरा सोपवण्यात आली आहे. तर सूर्यकुमार यादवकडे (Suryakumar Yadav) टी20 संघाची जबाबदारी देण्यात आली आहे. कसोटी संघाची जबाबदारी अनुभवी दिग्गज रोहित शर्मावर (Rohit Sharma) आहे.
रोहित शर्मा आणि विराट कोहली व्हाईटबॉल मालिकेत खेळताना दिसणार नाहीत. दोघांनीही या मालिकेतून विश्रांती देण्याची मागणी बीसीसीआयकडे केलीय. क्रिकेट बोर्डानेही रोहित-विराटच्या मागणीचा आदर करत त्यांना सुट्टी दिली आहे. एकदिवसीय आणि टी20 मालिका संपल्यानंतर रोहित आणि विराट टीम इंडियाच्या कॅम्पमध्ये सहभागी होतील. कसोटी संघात सीनिअर खेळाडूंना संधी देण्यात आलीय पण यातून अनुभवी अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजारा यांना पुन्हा एकदा डच्चू देण्यात आला आहे.
संघाचा उपकर्णधार होता रहाणे
भारतीय संघाचा शेवटचा शेवटचा कसोटी सामना वेस्ट इंडिजबरोबर झाला. दोन कसोटी सामन्यांच्या या मालिकेत अंजिक्य रहाणेवर उपकर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली होती. विंडिजविरुद्धच्या या मालिकेत रहाणेने केवळ 11 धावा केल्या होत्या. यानतंर निवड समितीचा अजिंक्य रहाणेवरचा भरोसा उडाला. याआधीही रहाणेला टीम इंडियामधून बाहेर काढण्यात आलं होतं. तब्बल दीड वर्ष रहाणे टीम इंडियातून बाहेर होता. त्यानंतर यावर्षीच झालेल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये रहाणने पुनरागम केलं. स्थानिक क्रिकेट आणि आयपीएलमधल्या दमदार कामगिरीच्या जोरावर त्याला टीम इंडियात घेण्यात आलं. पण रहाणेचं पुनरागमन मात्र यशस्वी ठरलं नाही. रहाणे आता 35 वर्षांचा झालाय. अशात टीम इंडियात पुन्हा संधी मिळणं जवळपास अशक्य आहे. रहाणे टीम इंडियासासाठी तब्बल 85 कोसटी सामने खेळला आहे. यात त्याने 5077 धावा केल्या आहेत. यात 12 शतक आणि 26 अर्धशतकांचा समावेश आहे.
अजिंक्य रहाणेची कसोटी कारकिर्द
- 85 मॅच, 5077 रन, 38.46 अॅव्हरेज
- 12 शतक, 26 अर्धशतक, 49.50 स्ट्राइक रेट
- 578 चौकार, 35 षटकार
पुजाराचं पुनरागमनही अशक्य
चेतेश्वर पुजारा आपला शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना याच वर्षी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये खेळला. या सामन्यात पुजाराने केवळ 41 धावा केल्या. यानंतर वेस्टइंडिजविरुद्धच्या मालिकेत पुजाराची निवड करण्यात आली नाही. 36 वर्षांचा चेतेश्वर पुजारा टीम इंडियात तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करतो. आत या नंबरवर ऋतुराज गायकवाड किंवा शुभमनला गिलला संधी मिळण्याची शक्यता आहे. पण चेतेश्वर पुजाराच्या कसोटी कारकिर्दीबद्दल बोलायचं झालं तर ते दमदार आहे. पण गेल्या काही सामन्यात तो आपल्या फॉर्मशी झग़ताना दिसतोय. पुजाराने 103 कसोटी सामन्यात 7195 धावा केल्या आहेत. यात 19 शतकं आणि 35 अर्धशतकांचा समावेश आहे. इंग्लंडविरुद्धच्या कसोटी सामन्यात पुजाराने नाबाद 206 धावांची सर्वोत्तम कामगिरी केली होती.
चेतेश्वर पुजाराची कसोटी कारकिर्द
- 103 मॅच, 7195 रन, 43.60 अॅव्हरेज
- 19 शतक, 35 अर्धशतक, 44.36 स्ट्राइक रेट
- 863 चौकार, 16 षटकार
2 कसोटी सामन्यांसाठी भारतीय संघ : रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, यशस्वी जायसवाल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, ऋतुराज गायकवाड़, ईशान किशन (विकेटकीपर), केएल राहुल (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकुर, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह (उप-कर्णधार), प्रसिद्ध कृष्णा.
3 एकदिवसीय सामन्यांसाठी भारतीय संघ : ऋतुराज गायकवाड, साई सुदर्शन, तिलक वर्मा, रजत पाटीदार, रिंकू सिंह, श्रेयस अय्यर, केएल राहुल(विकेटकीपर/कर्णधार), संजू सॅमसन (विकेटकीपर), अक्षर पटेल, वॉशिंगटन सुंदर, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल , मुकेश कुमार, आवेश खान, अर्शदीप सिंह, दीपक चाहर.
3 टी20 सामन्यांसाठी भारतीय संघ : यशस्वी जायसवाल, शुभमन गिल, ऋतुराज गायकवाड़, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), रिंकू सिंह, श्रेयस अय्यर, ईशान किशन (विकेटकीपर), जितेश शर्मा (विकेटकीपर), रवींद्र जडेजा (उप-कर्णधाक), वॉशिंगटन सुंदर, रवि बिश्नोई, कुलदीप यादव, अर्शदीप सिंह, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, दीपक चाहर.
भारताचा दक्षिण आफ्रिका दौरा
10 डिसेंबर- पहिला टी20 सामना, डरबन
12 डिसेंबर - दूसरा टी20 सामना, पोर्ट एलिजाबेथ
14 डिसेंबर - तीसरा टी20 सामना, जोहानिसबर्ग
17 डिसेंबर - पहला एकदिवसीय सामना, जोहानिसबर्ग
19 डिसेंबर - दूसरा एकदिवसीय सामना, पोर्ट एलिझाबेथ
21 डिसेंबर- तीसरा एकदिवसीय सामना, पार्ल
26 ते 30 डिसेंबर- पहिला कसोटी सामना, सेंचुरियन
3 ते 7 जानेवारी- दूसरा कसोटी सामना, जोहानिसबर्ग