Payal Ghosh On Irfan Pathan : बॉलिवूड अभिनेत्री पायल घोष (Payal Ghosh) तिच्या भन्नाट पोस्टमुळे नेहमी चर्चेत असते. वर्ल्ड कप सुरू असताना पायल घोषचं नाव अचानक चर्चेत आलं होतं. त्याला कारण मोहम्मद शमीला (Mohammed Shami) दिलेली ऑफर... पायलने पोस्ट लिहित शमीला लग्नाची मागणी घातली होती. शमी तू फक्त इंग्रजी सुधाकर, मी तुझ्यासह लग्न करण्यासाठी तयार आहे, असं पायल घोष हिने म्हटलं होतं. अशातच आता पायल घोष हिची एक पोस्ट चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. तिच्या या पोस्टवरून सध्या सोशल मीडियावर तुफान चर्चा होताना दिसत आहे.
आमचा ब्रेक अप झाल्यानंतर मी खूप रडले होते, मी आजारी देखील पडले. त्यामुळे की पुढील काही वर्ष काम करू शकले नाही. त्यावेळी मी फक्त इरफान पठाणवर प्रेम करत होते. त्यानंतर मला कोणावरही प्रेम झालं नाही, असं म्हणत पायल घोषने इरफान पठाणसोबतचा (Payal Ghosh On Irfan Pathan) एक फोटो शेअर केला आहे. 2011 पासून मी 5 वर्ष इरफान पठाणला डेट केलं. गौतम गंभीर (Gautam Gambhir) आणि अक्षय कुमार देखील माझ्याशी संपर्क साधण्याच्या प्रयत्नात होते. पण मी फक्त इरफानवर प्रेम केलं, असं पायल घोष म्हणाली आहे.
मी इरफान पठाणला याबद्दल सर्वकाही सांगितलं होतं. किंबहुना गंभीरने मला दिलेले मिस कॉलही त्याला दाखवले होते. त्यावेळी त्याचा भाऊ युसूफ पठाण, हार्दिक पांड्या आणि कृणाल पांड्या हे देखील होते. पुण्यात बडोदाचा डॉमेस्टिक क्रिकेट सामना सुरू असताना आमची ही भेट झाली होती, असा खळबळजनक आरोप पायल घोष हिने केला आहे.
After we broke up … I fell ill .. I couldn’t work for years… but he was the only guy whom I loved… after that I never loved anybody pic.twitter.com/vKRYWJl0Ti
— Payal Ghosh (@iampayalghosh) December 1, 2023
Gautam Gambhir mujhe regularly miscall dete the , yeh Irfan ko bohot achhi ta rah pata tha , woh mera sab calls check karta tha .. woh yeh baat mere Samna Yusuf bhai, Hardik Aur Krunal Pandya ko bhi bataya tha jab main irfan ko Pune mein Milne gayi thi.. Domestic match tha…
— Payal Ghosh (@iampayalghosh) December 1, 2023
दरम्यान, पायल घोषने मोहम्मद शमीला दिलेल्या लग्नाच्या प्रस्तावावर हसीन जहाँने प्रतिक्रिया दिली आहे. 'प्रसिद्ध व्यक्तींसोबत या गोष्टी घडत असतात. ही खूप सामान्य गोष्ट आहे. मला यावर काहीच बोलायचं नाही,'' असे हसीन जहाँ म्हणाली. त्याला आयुष्यात एक करोडपती अभिनेत्री हवी आहे. याच कारणामुळे तो मला त्रास देत असे आणि या काळात त्याने आपल्या मुलीचा विचारही केला नाही, असे हसीन जहाँ म्हणाली होती.