T20 World Cup: रविंद्र जडेजाच्या जागी टीम इंडियात कोण? 'या' तीन खेळाडूंची नावं आघाडीवर

टी20 वर्ल्ड कपसाठी भारतीय संघात कोणाला संधी मिळणार? निवड समितीसमोर आव्हान

Updated: Sep 11, 2022, 08:54 PM IST
T20 World Cup: रविंद्र जडेजाच्या जागी टीम इंडियात कोण? 'या' तीन खेळाडूंची नावं आघाडीवर title=

T20 World Cup: एशिया कप (Asia Cup 2022) स्पर्धेत लाजीरवाण्या पराभवानंतर टीम इंडियाला (Team India) स्पर्धेबाहेर पडावं लागलं. आता टीम इंडियाचं लक्ष्य आहे ते टी20 वर्ल्ड कपवर (T20 World Cup). त्याआधी टीम इंडिया ऑस्ट्रेलिया (Australia) आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध (South Africa) मालिका खेळणार आहे. टी20 वर्ल्ड कपसाठी येत्या आठवड्यात टी इंडियाची घोषणा केली जाईल. पण निवड समितीसमोर (Indian Selectors) मुख्य आव्हान आहे ते रवींद्र जडेजाऐवजी (Ravindra Jadeja) भारतीय टीमध्ये कोणत्या खेळाडूला संधी द्यायची.

एशिाय कप स्पर्धेदरम्यान रविंद्र जडेजा दुखापतग्रस्त झाला. त्याच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यामुळे रविंद्र जडेजा एशिया कप स्पर्धेबरोबरच टी-20 वर्ल्ड कपमधूनही बाहेर पडला. एशिया कप स्पर्धेत पाकिस्तान (Pakistan) आणि हाँगकाँगविरुद्धच्या (Hongkong) विजयात रविंद्र जडेजा प्रमुख भूमिका बजावली होती.

रविंद्र जडेच्या जागी आता तीन अष्टपैलू खेळाडूंची नावं चर्चेत आहे. ज्यांना टी इंडियात संधी मिळू शकते.

वॉशिंग्टन सुंदर
दुखापतीमुळे वॉशिंग्टन सुंदर (Washington Sundar) बराच काळ आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर होता. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केल्यापासूनच वॉश्टिंग्टन दुखापतीमुळेच अधिक चर्चेत राहिला. पण आता तो पूर्णपणे तंदुरुस्त असून टीम इंडियात पुनरागमन करण्यासाठी सज्ज झालाय. रविंद्र जडेजाला पर्याय म्हणून वॉशिंग्टन सुंदरचं नाव आघाडीवर आहे. पॉवर प्लेमध्ये प्रभावी ऑफ स्पिन करण्याबरोबरच वेगाने धावा काढण्यातही वॉशिंग्टन ओळखला जातो.

शाहबाज अहमद
आयपीएलमधल्या रॉयल चॅलेंजर्स बंगलोरचा अष्टपैलू खेळाजू शाहबाज अहमदने (Shahbaz Ahmed) झिम्बाब्वेविरुद्धच्या मालिकेत टीम इंडियात जागा पटकावली. पण अंतिम अकरामध्ये मात्र त्याला संधी मिळू शकली नाही. पण आता टी20 साठी शाहबाजचा पुन्हा एकदा विचार केला जाऊ शकतो. आयपीएलमध्ये शाहबाजने स्वत:ला सिद्ध केलं आहे.

अक्षर पटेल
रविंद्र जडेजा दुखापतग्रस्त झाल्यानंतर एशिया कप स्पर्धेत टीम इंडियात स्पीन गोलंदाज अक्षर पटेलला (Axer Patel) संघात संधी देण्यात आली. वॉशिंग्टन सुंदरबरोबरच अक्षर पटेलही टी20 साठी प्रबळ दावेदार मानला जात आहे. 2015 च्या वर्ल्ड कप स्पर्धेत अक्षर पटेल भारतीय टीममध्ये होता. आणि आता सात वर्षांनंतर पुन्हा एका वर्ल्ड कप स्पर्धेत खेळण्यासाठी तो सज्ज झालाय. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेतही अक्षरला संधी मिळू शकते.