श्रेयस अय्यरच्या 'या' वक्तव्याने कोहलीचं टेन्शन वाढलं, होऊ शकतो मोठा वाद

श्रीलंकेविरुद्ध दमदार कामगिरी करणाऱ्या श्रेयस अय्यरने केलेल्या वक्तव्याने टीम इंडियात वाद होणार?

Updated: Feb 28, 2022, 02:29 PM IST
श्रेयस अय्यरच्या 'या' वक्तव्याने कोहलीचं टेन्शन वाढलं, होऊ शकतो मोठा वाद title=

धर्मशाला : टीम इंडियाचा (Team India) मधल्या फळीतील फलंदाज श्रेयस अय्यरने (Shreyas Iyer) एक वक्तव्य करून खळबळ उडवून दिली आहे. श्रेयस अय्यरचे हे विधान टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहलीसाठी (Virat Kohli) अडचणीचं शकतं. श्रीलंकेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेत (India Shrilanka T-20 Series) विराट कोहलीच्या अनुपस्थितीत श्रेयस अय्यरला तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीची संधी देण्यात आली होती.  तिसऱ्या क्रमांकावर दमदार फलंदाजी करत श्रेयस अय्यरने कोहलीचं टेन्शन वाढवलं आहे. 

श्रेयस अय्यरचं मोठं वक्तव्य
श्रीलंकाविरुद्धच्या तीन टी-20 सामन्यात श्रेयस अय्यरने तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना तब्बल 204 धावा केल्या आहेत. यात त्याने तीन अर्धशतकं केली आहेत. या दमदार कामगिरीमुळे श्रेयस अय्यर 'मॅन ऑफ द सीरिज'चाही मानकरी ठरला. या कामगिरीनंतर श्रेयस अय्यरने भारतीय संघात नंबर तीनच्या जागेसाठी दावा ठोकला आहे. टीम इंडियात तिसऱ्या क्रमांकावर विराट कोहली फलंदाजी करतो.

कोहलीचं टेन्शन वाढलं
या सीरिजनंतर बोलताना श्रेयस अय्यरने तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून भारतीय संघात तीसऱ्या क्रमांकावर विराट कोहली फलंदाजी करतोय. याबद्दल बोलताना श्रेयस अय्यर म्हणतो, वैयक्तिक रित्या पाहिलं तर माझ्यासाठी तिसरा नंबर हा सर्वश्रेष्ठ आहे. टी-20 फॉर्मेटमध्ये तिसऱ्या क्रमांकाच्या फलंदाजावर मोठी जबाबदारी असते. खालच्या क्रमांकवर आलेल्या फलंदाजांकडे तितका वेळ नसतो, त्यांना प्रत्येक बॉलवर धावा करण्याचा दबाव असतो.

श्रेयस अय्यरच्या वक्तव्याने वाद?
भारतीय संघात खेळाडूंमध्ये जबरदस्त स्पर्धा आहे. प्रत्येक खेळाडूमध्ये सामना जिंकून देण्याची क्षमता असल्याचं श्रेयस अय्यरने म्हटलं आहे. त्यामुळे मिळालेल्या प्रत्येक संधीचं सोनं करण्याचा माझा प्रयत्न असतो, सामना संपवण्याच्या इराद्याने मी मैदानात उतरतो, असं श्रेयसने म्हटलं आहे. 

टीम इंडियाला सापडला मॅच विनर
श्रीलंकेविरुद्धच्या तीनही सामन्यात श्रेयस अय्यरने हाफसेंच्युरी ठोकली आहे. पहिल्या टी-20 सामन्यात श्रेयसने 28 बॉलमध्ये 57 धावा केल्या, तर दुसऱ्या टी-20 सामन्यात त्याने 44 धावात तब्बल 74 धावा कुटल्या. तिसऱ्या टी-20 सान्यातही श्रेयसची बॅट तळपली. त्याने 45 बॉलमध्ये 75 धावा करत भारतीय संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला आहे. श्रेयसचा सध्याचा फॉर्म बघता भारतीय संघाला प्रतीक्षा असलेला मॅच विनर खेळाडू सापडला असं बोललं जात आहे. 

टी-२० वर्ल्ड कपमध्ये जागा पक्की?
श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात दमदार कामगिरी करत श्रेयस अय्यरने ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी-२० वर्ल्डकप साठी भारतीय संघात आपली जागा पक्की केली आहे. याबाबत सध्या बोलणं चुकीचे ठरेल, कारण संघात जागा टिकवण्यासाठी चांगलीच चुरस असल्याचं श्रेयस अय्यरने म्हटलं आहे.