एमएस धोनीच्या जबरा फॅनची आत्महत्या, ज्या घराला माहिचं नाव दिलं त्याच घरात आढळला मृतदेह

MS Dhoni Fan Suicide : भारताच्या सर्वात यशस्वी कर्णधारांमध्ये महेंद्रसिंग धोनीची गणना होते. देशासह जगभरात माहीचे अनेक चाहते आहेत. पण एक चाहता असा होता ज्याने एमएस धोनीच्या प्रेमापोटी आपल्या घराला चेन्नई सुपर किंग्सचा पिवळा रंगा दिला होता. या जबरा फॅनने आत्महत्या केली आहे. 

राजीव कासले | Updated: Jan 19, 2024, 07:36 PM IST
एमएस धोनीच्या जबरा फॅनची आत्महत्या, ज्या घराला माहिचं नाव दिलं त्याच घरात आढळला मृतदेह title=

MS Dhoni Fan Suicide : भारतीय क्रिकेटचा सर्वात यशस्वी कर्णधार असलेल्या महेंद्रसिंग धोनीचे (MS Dhoni) जगभरात अनेक फॅन आहेत. यापैकीच एक असलेल्या एक चाहत्याने गुरुवारी टोकाचं पाऊल उचललं.  चेन्नई सुपर किंग्सचा (Chennai Super Kings) समर्थक आणि धोनीचा जबरा फॅन (MS Dhoni Fan) असलेला हा चाहता 2020 मध्ये चर्चेत आला होता. सीएसके आणि धोनीच्या प्रेमापोटी या चाहत्याने आपलं घरंही पिवळ्या रंगात रंगवलं होतं. घरावर त्याने 'होम ऑफ धोनी' असं लिहिलं होतं. 2020 मध्ये हे घर आणि हा चाहता चागंलेत व्हायरल झाले. धोनीच्या या जबरा फॅनचं नाव गोपी कृष्णन (Gopi Krishnan) असं होतं. गोपी तामिळनाडूतल्या अरनगुर इथं राहाणारा होता. ज्या घराला त्याने धोनीचं नाव दिलं होतं. त्याच घरात त्याचा मृतदेह आढळला. 

याप्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली असून गुरुवारी पहाटे 4.30 वाजता गोपीने आपल्या राहात्या घरात आत्महत्या केली. आत्महत्येमागे जुना वाद कारणीभूत असल्याचं बोललं जात आहे. गोपीचा भाऊ राम याने दिलेल्याा माहितीनुसार गोपी आणि शेजारच्या गावातील काही लोकांचा पैशांवरुन वाद सुरु होता. काही दिवसांपूर्वीच गोपी कृष्णन आणि त्या लोकांमध्ये हाणामारीही झाली होती. यात गोपी जखमी झाला होता. या घटनेनंतर गोपी कृष्णन खुप दु:खी होता असं त्याच्या भावाने सांगितलं. पोलिसांना आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. या वादामुळेच गोपीने आत्महत्या केली की इतर काही कारण होतं, याचा पोलीस तपास करत आहेत. 

फोटो झाले होते व्हायरल
गोपी कृष्णनच्या घराचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते. सीएसके चाहत्यांनी गोपीचं कौतुक केलं होतं. सीएसकेच्या रंगात घरं रंगवनं आणि घराला धोनीचं नाव देण्याला गोपीच्या घरच्यांचाही पाठिंबा होता. 2020 मध्ये व्हायरल झालेल्या व्हिडिओत गोपीने आपल्या संपूर्ण कुटुंबाचे आभार मानले होते. 

धोनीनेही केलं होतं कौतुक
सोशल मीडियावर व्हायरल होणारे गोपी आणि त्याच्या घराचे फोटो आणि व्हिडिओ महेंद्रसिंग धोनीपर्यंतही पोहोचले होते.  चाहत्याने स्वत:च्या घराला आपलं नाव दिल्याचं पाहून धोनी प्रचंड खुश झाला होता. त्याने गोपीचं कौतुकही केलं होतं. चेन्नई सुपर किंग्सच्या अधिकृत एक्स अकाऊंटर गोपी कृष्णनच्या घराचे फोटो आणि व्हिडिओ शेअर केले होते. आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्च्या प्रत्येक सामन्याला गोपी कृष्णन हजेरी लावत होता.