IND vs SL 1st ODI : टी20 मालिकेत यजमान श्रीलंकेला धुव्वा उडवल्यानंतर आता टीम इंडिया (Team India) एकदिवसीय मालिकेसाठी सज्ज झालीय. भारत आणि श्रीलंकेदरम्यान तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेला (India vs Sri Lanka ODI Series) शुक्रवार म्हणजे 2 ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे. एकिदवसीय मालिकेतील तीनही सामने कोलंबोतल्या प्रेमदासा स्टेडिअमवर खेळवले जाणार असून भारतीय वेळेनुसार दुपारी 2.30 वाजता सामन्याला सुरुवात होईल. टी20 वर्ल्ड कप 2024 ट्रॉफी जिंकल्यानंतर पहिल्यांदाच रोहित शर्मा आणि विराट कोहली मैदानावर उतरणार आहेत. रोहित शर्माकडे एकदिवसीय संघाची धुरा असणार आहे. टी20 संघातील काही खेळाडूंना एकदिवसीय संघात स्थान देण्यात आलेलं नाही.
अशी असेल टीम इंडियाची प्लेईंग XI
श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यासाठी टीम इंडियाची प्लेईंग इलेव्हनही जवळपास निश्चित झालीय. संघात अनेक खेळाडूंचं कमबॅक झालंय. कर्णधार रोहित शर्मा आणि उपकर्णधार शुभमन गिल टीम इंडियाच्या डावाची सुरुवात करतील. रोहित शर्मा संघाला आक्रमक सुरुवात करुन देण्यासाठी प्रसिद्ध आहे. तर शुभमन गिलही सध्या चांगल्या फॉर्मात आहे.
तिसऱ्या क्रमांकावर टीम इंडियचा स्टार फलंदाज विराट कोहली मैदानावर उतरेल. टी20 वर्ल्ड कपमध्ये विराट कोहलीने रोहितबरोबर सलामी केली होती. पण आता एकदिवसीय सामन्यात तो पुन्हा आपल्या आवडत्या क्रमांकावर फलंदाजी करताना दिसणार आहे. आयसीसी एकदिवसीय वर्ल्ड कप 2023 नंतर विराट कोहली पहिल्यांदाच एकदिवसीय सामन्यात खेळताना दिसणार आहे. तर चौथ्या क्रमांकावर आक्रमक फलंदाज श्रेयस अय्यरला संधी मिळू शकते. मधल्या फळीत झटपट धावा करण्यासाठी श्रेयस अय्यर ओळखला जातो.
विकेटकिपर-फलंदाज म्हणून ऋषभ पंत आणि केएल राहुल यांना संघात संधी देण्यात आली आहे. पण पहिल्या एकदिवसीय सामन्यात केएल राहुलला संधी मिळण्याची शक्यता असून पाचव्या क्रमांकावर केएल राहुल फलंदाजीला उतरेल. वर्ल्ड कप 2023 मध्ये केएल राहुलने दमदार कामगिरी केली होती. तर ऑलराऊंडर शुभम दुबेला सहाव्या क्रमांकावर संधी मिळू शकते. डेथ ओव्हरमध्ये षटकार-चौकारांची बरसात करण्याची क्षमता शुभम दुबेकडे आहे. याशिवाय तो मध्यमगती गोलंदाजही आहे.
टीम इंडियात फिरकीची जबाबदारी अक्षर पटेल आणि कुलदीप सिंगवर असणार आहे. वॉशिंग्टन सुंदरला मात्र बाहेर बसावं लागण्याची शक्यता आहे. तर पहिल्या एकदिवसीय सामन्यात मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंह आणि युवा हर्षित सिंह हे वेगवान गोलंदाज असतील. टीम इंडियाचा प्रमुख वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला या मालिकेत विश्रांती देण्यात आली आहे.
पहिल्या एकदिवसीय सामन्यासाठी भारताची प्लेईंग इलेव्हन
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), शिवम दुबे, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंह, हर्षित राणा.
एकदिवसीय मालिकेचं वेळापत्रक
पहिला एकदिवसीय सामना, 2 ऑगस्ट, दुपारी 2:30 वाजता, कोलंबो
दूसरा एकदिवसीय सामना, 4 ऑगस्ट, दुपारी 2:30 वाजता, कोलंबो
तीसरा एकदिवसीय सामना, 7 ऑगस्ट, दुपारी 2:30 वाजता, कोलंबो