IPL 2023: एमएम धोनीचा परिसस्पर्श, 20 वर्षाच्या खेळाडूची थेट राष्ट्रीय संघात निवड

PL 2023: आयपीएलच्या सोळाव्या हंगामात एमएस धोनीच्या चेन्नई सुपर किंग्सने आयपीएल ट्रॉफी जिंकली. या विजयानंतर CSK संघात खेळणाऱ्या एका खेळाडूचं नशीह चांगलंच चमकलं आहे. 

राजीव कासले | Updated: May 31, 2023, 03:35 PM IST
IPL 2023: एमएम धोनीचा परिसस्पर्श, 20 वर्षाच्या खेळाडूची थेट राष्ट्रीय संघात निवड title=

Chennai Super Kings: इंडियन प्रीमिअर लीग (IPL 2023) अर्थात आयपीएलचा सोळावा हंगाम संपलाय. एमएस धोनीच्या (MS Dhoni) चेन्नई सुपर किंग्सने (Chennai Super Kings) पाचव्यांदा आयपीएलच्या ट्रॉफीवर नाव कोरलं. याबरोबरच चेन्नईने मुंबई इंडियन्सच्या (Mumbai Indians) सर्वाधिक विजयाचीही बरोबर केली आहे. अंतिम सामन्यात रविंद्र जडेजाच्या (Ravindra Jadeja) अष्टपैलू खेळाडूच्या जोरावर चेन्नईने गुजरात टायटन्सवर (Gujrat Titans) मात केली. चेन्नईने आयपीएल ट्ऱॉफी जिंकली आणि चेन्नई संघात खेळणाऱ्या एका खेळाडूचं नशीबही उघडलं. अवघ्या विसाव्या वर्षात या खेळाडूला राष्ट्रीय संघात स्थान मिळालं आहे. 

थेट राष्ट्रीय संघात स्थान
चेन्नई सुपर किंग्समधून आयपीएलमध्ये पदार्पण करणारा श्रीलंकेची वेगवान गोलंदाज मथीशा पथिरानाचं (Matheesha Pathirana) नशिब चमकलं आहे. अफगाणिस्तानविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी पथिरानाला श्रीलंका संघात संधी देण्यात आली आहे. श्रीलंका क्रिकेट बोर्डाने ही घोषणा केलीय. मथीशा पथिराना डेथ ओव्हर स्पेशलिस्ट म्हणून ओळखला जातो. धोनीने आयपीएलमध्ये 20 वर्षांच्या पथिरानावर डेथ ओव्हरची जबाबदारी दिली होती. पथिरानानेही कर्णधाराचा निर्णय चुकीचा ठरवला नाही. शेवटच्या षटकात दमदार यॉर्करच्या जोरावर पथिरानाने फलंदाजांच्या नाकीनऊ आणले होते. 

IPLधोनीचं ब्रम्हास्त्र
आयपीएल 2023 स्पर्धेत मथीशा पथिरानाने घातक गोलंदाजी केली आहे. ज्या ज्या वेळी धोनीने पथिरानाच्या हातात चेंडू सोपवला. त्या त्यावेळी पथिरानाने चेन्नईसाठी विकेट घेतले आहेत. पथिरानाने 12 सामन्यात एकूण 19 विकेट घेतल्या आहेत. 15 धावात 3 विकेट ही यंदाच्या आयपीएलमधली पथिरानाची सर्वोत्तम कामगिरी ठरलीय. 

टी20 क्रिकेटमध्ये पदार्पण
पथिरानाने श्रीलंकेच्या टी20 क्रिकेटमध्ये पदार्पण केलं आहे. पण त्याला आतापर्यंत केवळ 2 सामन्यातच खेळण्याची संधी मिळाली आहे. यात त्याने 2 विकेट घेतल्या आहेत. आता आयपीएलमधल्या कामगिरीच्या जोरावर त्याला थेट श्रीलंकेच्या एकदिवीस संघात संधी देण्यात आली आहे.  पथिरानाची गोलंदाजी स्टाईल ही श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगा सारखी आहे. त्यामुळेच पथिरानाला बेबी मलिंगा असंही बोललं जातं. 

पथिरानाच्या कुटुंबियांची भेट
विशेष म्हणजे पथिरानाचं संपूर्ण कुटुंब एमएम धोनीचे फॅन्स आहेत. अंतिम सामन्याआधी पथिरानाच्या कुटुंबियांनी धोनीची भेट घेतली होती. पथिरानाची बहिण विशुकाने हा फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. या फोटोबरोबर तीने भावूक कॅप्शनही दिला आहे. तसंच धोनीचं कौतुकही केलं होतं. 

श्रीलंकेचा एकदिवसीय संघ
दासुन शनाका (कर्णधार), कुसल मेंडिस, पाथुम निसंका, दिमुथ करुणारत्ने, सादीरा समरविक्रमा, एंजेलो मॅथ्यूज, धनंजया डी सिल्वा, चरित असलंका, वानिंदु हसरंगा, महेश तीक्षाना, दुशान हेमंथा, चमक करुणारत्ने, दुशमंता चमीरा, मथीशा पथिराना, लाहिरू कुमारा, कसुन राजिता