WTC 2023 Final Time In India: इंडियन प्रमिअर लिगच्या 2023 (IPL 2023) चं पर्व समाप्त झालं आहे. दीड महिन्यांच्या या स्पर्धेनंतर आता भारतीय क्रिकेट चाहत्यांचं लक्ष लागलं आहे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलकडे (WTC Final)! इंग्लंडमध्ये 7 जूनपासून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या संघांदरम्यान खेळवला जाणार आहे. भारतीय संघातील सदस्य यासाठी इंग्लडला टप्प्याटप्प्यात रवानाही झाले आहेत. पहिल्या पर्वामध्येही भारतीय संघ अंतिम सामना खेळला होता. मात्र या सामन्यामध्ये न्यूझीलंडच्या संघाने भारताला पराभूत केलं होतं. त्यामुळेच यंदा ऑस्ट्रेलिया पराभूत करुन आयसीसीची ही मानाची ट्रॉफी जिंकण्याचा भारतीय संघाचा मानस असेल. मात्र परदेशात होणारा हा सामना भारतात नक्की किती वाजता आणि कसा पाहता येणार याबद्दल क्रिकेट चाहत्यांमध्ये संभ्रम आहे. याचसंदर्भात जाणून घेऊयात...
भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यानचा हा अंतिम सामना इंग्लंडमध्ये खेळवला जाणार आहे. हा सामना लंडनमधील केनिंग्टनमध्ये द ओव्हल मैदानावर खेळवला जाणार आहे.
भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान आतापर्यंत 106 कसोटी सामने खेळवण्यात आले आहेत. यापैकी 32 सामने भारतीय संघाने जिंकलेत तर ऑस्ट्रेलियाने एकूण 44 कसोटींमध्ये विजय मिळवला आहे. यापैकी 29 सामने ड्रॉ झाले आणि 1 कसोटी सामना टाय झाला होता.
रोहित शर्मा (कर्णधार), चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, शुभमन गिल, अजिंक्य रहाणे, रवींद्र जडेजा, केएस भरत (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, शार्दुल ठाकुर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव, जयदेव उनाडकट, इशान किशन (यष्टीरक्षक)
राखीव खेळाडू - सूर्यकुमार यादव, यशस्वी जायसवाल, मुकेश कुमार
पॅट कमिंस (कर्णधार), स्टीव स्मिथ (उप-कर्णधार), स्कॉट बोलॅण्ड, कॅमरन ग्रीन, मार्कस हैरिस, उस्मान ख्वाजा, मारनस लाबुस्चगने, एलेक्स केरी (यष्टीरक्षक), जोश हेजलवूड, ट्रैविस हेड, जोश इंगलिस (यष्टीरक्षक), नेथन लिऑन, टॉड मर्फी, मिशेल स्टार्क, डेविड वार्नर
राखीव खेळाडू - मिच मार्श, मैथ्यू रेनशॉ
हा सामना भारतीय प्रेक्षकांना लाइव्ह पाहता येणार आहे. भारतात या सामन्याचं लाइव्ह स्ट्रीमींग स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर होणार आहे. तर ऑनलाइन स्ट्रीमिंग डिस्ने प्लस हॉटस्टार अॅपवरुन पाहता येणार आहे.
भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यानचा हा सामना 7 जून ते 11 जून दरम्यान खेळवला जाणार आहे. पाऊस आणि इतर गोष्टींचा विचार करुन या सामन्यासाठी राखीव दिवसही ठेवण्यात आला आहे. हा ऐतिहासिक कसोटी सामना भारतीय वेळेनुसार दुपारी 3 वाजल्यापासून सुरु होणार आहे.