टीम इंडियात सलामीसाठी तगडी चुरस, 3 वर्षात 32 ओपनर्स... पाहा कोणाचं पारडं जड

Team India Openers: टीम इंडियात आता नव्या युगाची नांदी सुरु झालीय. युवा खेळाडूंनी संघाता आपला दावा ठोकलाय. यातही सलामीच्या जागेसाठी कडवी चुरस पाहिला मिळतेय. दक्षिण आफ्रिका दौऱ्यात अर्धा डझन खेळाडू असे आहेत जे सलामीवीर म्हणूळ ओळखले जातात. 

राजीव कासले | Updated: Dec 7, 2023, 09:37 PM IST
टीम इंडियात सलामीसाठी तगडी चुरस, 3 वर्षात 32 ओपनर्स... पाहा कोणाचं पारडं जड title=

Team India Openers Batter Analysis: टीम इंडिया दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर असून येत्या रविवारी म्हणजे 10 डिसेंबरला पहिला टी20 सामना खेळवला जाणार आहे. दक्षिण आफ्रिका दौऱ्यात युवा खेळाडूंना जास्तीत जास्त संधी देण्यात आली आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी20 मालिकेत युवा खेळाडूंनी स्वत:ला सिद्ध केलंय. त्यामुळे भारतीय क्रिकेट संघात (Team India) त्यांनी आपला दावा ठोकलाय. यातही सलामीच्या फलंदाजीसाठी जबरदस्त चुरस रंगताना पाहिला मिळेतय. बीसीसीआयने (BCCI) दक्षिण आफ्रिका दौऱ्यातील तीनही फॉर्मेटसाठी जे खेळाडू निवडलेत त्यात अर्ध्या डझनहून अधिक खेळाडू ओपनर्स आहेत. याव्यतिरिक्त इतरही असे काही खेळाडू आहेत ज्यांनी एक किंवा दोनवेळा संघासाठी सलामीला फलंदाजी केली आहे. 

1 जानेवारी 2020 पासून टीम इंडियासाठी टी20 क्रिकेटमध्ये 14 खेळाडूंनी ओपनिंग केलीय. एकदिवसीय सामन्यात 11 खेळाडूंनी ओपनिंग केलीय. तर कसोटीत सात खेळाडूंनी सलामीला येत फलंदाजी केलीय. म्हणजे गेल्या तीन वर्षात टीम इंडियाने 32 ओपनर्स पाहिलेत. सुरुवातील आपण पाहुयात दक्षिण आफ्रिका दौऱ्यात कोणते खेळाडू सलामीचे दावेदार आहेत.  

द.आफ्रिका दौऱ्यात सलामीचे फलंदाज
दक्षिण आफ्रिका दौऱ्यात सलामीचा फलंदाज ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) टीम इंडियासाठी तीनही फॉर्मेटमध्ये खेळताना दिसणार आहे. त्याआधी शुभमन गिल (Shubman Gill) टीम इंडियाच्या तीनही फॉर्मेटमध्ये ओपनिंग फलंदाज होता. त्यामुळ भविष्यात ऋतुराज गायकवाड आणि शुभमन गिलमध्ये ओपनिंग फलंदाजीसाठी तगडी चुरस आहे. 

टीम इंडियात सध्याचे ओपनर्स
टी20 सामन्यातील सलामीचे फलंदाज  : यशस्वी जायसवाल, शुभमन गिल, ऋतुराज गायकवाड, ईशान किशन 
एकदिवसीय सामन्यासाठी सलामीचे फलंदाज :  ऋतुराज गायकवाड़, साई सुदर्शन, केएल राहुल, संजू सॅमसन 
कसोटी सामन्यासाठी सलामीचे फलंदाज  :  रोहित शर्मा, शुभमन गिल, यशस्वी जायसवाल,  ऋतुराज गायकवाड, ईशान किशन, केएल राहुल  

1 जानेवारी 2020 नंतर टी20 संघात 14 ओपनर्स
टीम इंडिया व्यवस्थापनाने टी20 सामन्यांसाठी अनेक फलंदाजांना संधी दिली. पण यात सर्वात यशस्वी सलामीवीर होता तो रोहित शर्मा. 

रोहित शर्मा : सामने - 41, धावा - 1139,  शतक - 0,  अर्धशतक - 9
केएल राहुल: सामने - 38, धावा - 1127,  शतक - 0,  अर्धशतक - 14
ईशान किशन : सामने - 27, धावा - 662,  शतक - 0,  अर्धशतक - 4
ऋतुराज गायकावाड :  सामने - 18, धावा - 500,  शतक - 1,  अर्धशतक - 3
यशस्वी जयस्वाल :  सामने - 13, धावा - 370,  शतक - 1  अर्धशतक - 2
शुभमन गिल :  सामने - 11, धावा - 304,  शतक - 1,  अर्धशतक - 1
शिखर धवन :  सामने - 10, धावा - 255,  शतक - 0,  अर्धशतक - 2
विराट कोहली -  सामने - 2, धावा - 202,  शतक - 1,  अर्धशतक - 1
सूर्यकुमार यादव :  सामने - 4, धावा - 135,  शतक - 0,  अर्धशतक - 1
संजू सॅमसन  :  सामने - 4, धावा - 105,  शतक - 0,  अर्धशतक - 1
ऋषभ पंत :  सामने - 5, धावा - 71,  शतक - 0,  अर्धशतक - 1
श्रेयस अय्यर :  सामने -  1, धावा - 64,  शतक - 0,  अर्धशतक - 1
दीपक हुड्डा :  सामने - 1, धावा - 47,  शतक - 0,  अर्धशतक - 0
पृथ्वी शॉ :  सामने - 1, धावा - 0,  शतक - 0,  अर्धशतक -0

1 जानेवारी 2020 पासून टीम इंडियाचे 11 वनडे ओपनर्स 
एकदिवसीय प्रकारात 1 जानेवारी 2020 पासून शुभमन गिल हा टीम इंडियाचा सर्वात यशस्वी सलामीाच फलंदाज ठरला आहे. त्यानंतर रोहित शर्माचा नंबर येतो. तर शिखर धवननेही चांगली कामगिरी केली आहे. पण बीसीसीने धवनकडे दुर्लक्षचं केल्याचं दिसंतय.

शुभमन गिल  : सामने -  40, धावा - 2092,  शतक - 5,  अर्धशतक - 13
रोहित शर्मा :  सामने -  38, धावा - 1702,  शतक - 3,  अर्धशतक - 11
शिखर धवन : सामने -  33, धावा - 1275,  शतक - 0,  अर्धशतक - 12
ईशान किशान : सामने -  9, धावा - 495,  शतक - 1,  अर्धशतक - 3
पृथ्वी शॉ : सामने -  6, धावा - 189,  शतक - 0,  अर्धशतक - 0
केएल राहुल : सामने -  6, धावा - 126,  शतक - 0,  अर्धशतक - 1
मयंक अग्रवाल : सामने -  5, धावा - 86,  शतक - 0,  अर्धशतक - 0
ऋतुराज गायकवाड : सामने -  2, धावा - 79,  शतक - 0,  अर्धशतक - 1
ऋषभ पंत : सामने -  1, धावा - 18,  शतक - 0,  अर्धशतक - 0
वॉशिंग्टन सुंदर : सामने -  1, धावा - 1,  शतक - 0,  अर्धशतक - 0
विराट कोहली : सामने -  1, धावा - 1,  शतक - 0,  अर्धशतक - 0

1 जानेवरी 2020 पासून टीम इंड‍ियाचे 7 टेस्ट ओपनर्स
कसोटी क्रिकेटमध्ये बीसीसीआयने सर्वात कमी फलंदाजांनी सलामीसाठी संधी दिली आहे. कसोटी क्रिकेटमध्ये रोहित शर्माने सलामीचं आपलं स्थान भक्कम केलं आहे. 

रोहित शर्मा : सामने -  20, धावा - 1536,  शतक - 4,  अर्धशतक - 6
शुभमन गिल : सामने -  16, धावा - 874,  शतक - 2,  अर्धशतक - 4
केएल राहुल : सामने -  11, धावा - 636,  शतक - 2,  अर्धशतक -2
मयंक अग्रवाल : सामने -  11, धावा - 569,  शतक - 1,  अर्धशतक - 3
यशस्वी जयस्वाल : सामने -  2, धावा - 266,  शतक - 1,  अर्धशतक - 1
चेतेश्वर पुजारा : सामने -  2, धावा - 126,  शतक - 0,  अर्धशतक - 1
पृथ्वी शॉ : सामने -  3, धावा - 102,  शतक - 0,  अर्धशतक - 1

शुभमन गिल VS ऋतुराज गायकवाडमध्ये तगडी चुरस
दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी 30 नोव्हेंबरला भारतीय संघाची घोषणा करण्यात आली. पण ऑल फॉर्मेट प्लेअरमधून शुभमन गिलला वगळण्यात आलं आहे. त्याच्याजागी ऋतुरा गायकवाडला संधी देण्यात आली आहे. एशियन गेम्स 2023 मध्ये टीम इंडियाची कमान सांभाणारा ऋतुरा गायकवाड आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्सचा हुमकी एक्का आहे. भारतासाठी ऋतुराजने 4 एकदिवीस सामन्यात 106 धावा केल्यात आहेत. तर 19 आंतरराष्ट्रीय टी20 सामन्यात 140.05 स्ट्राईक रेटने त्याने 500 धावा केल्या आहेत. ऋतुराज गायकवाडचं अद्याप कसोटी पदार्पण झालेलं नाही. दक्षिण आफ्रिका दौऱ्यात ऋतुराजचं कसोटी पदार्पण होण्याची शक्यता आहे. नुकत्याच झालेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी20 सामन्यात ऋतुराजने 55.75 च्या अॅव्हरेजने 223 धावा केल्या. यात त्याने एक शतक आणि एक अर्धशतक ठोकलं. मालिकेत सर्वाधिक धावा त्याच्या नावावर होत्या, शुभमन गिलला या मालिकेतून विश्रांती देण्यात आली होती. 

दुसरीकडे शुभमन गिलने विश्वचषक स्पर्धेत 9 सामन्यात 106.94 च्या स्ट्राईक रेटने 354 धावा केल्यात. गिलने 18 कसोटी सामन्यात 966 धावा, 44 एकदिवसीय सामन्यात 2271 धावा आणि 11 टी20 सामन्यात 304 धावा केल्या आहेत. पण आता शुभमन गिलला सर्वाधिक आव्हन आहे ते ऋतुराज गायकवाडचं. दोघंही तरुण आहेत, दोघांच्याही क्रिकेट कारकिर्दीला नुकतीच सुरुवात झालीय. आता यापैकी सलामीच्या शर्यतीत कोण टिकणार हे येणारा काळच ठरवेल.

दक्षिण आफ्रिका दौऱ्यात भारताचा टी20 संघ
यशस्वी जायसवाल, शुभमन गिल, ऋतुराज गायकवाड़, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), रिंकू सिंह, श्रेयस अय्यर, ईशान किशन (विकेटकीपर), जितेश शर्मा (विकेटकीपर), रवींद्र जडेजा (उपकर्णधार), वॉशिंगटन सुंदर , रवि बिश्नोई, कुलदीप यादव, अर्शदीप सिंह, मो. सिराज, मुकेश कुमार, दीपक चाहर

दक्षिण आफ्रिका दौऱ्यात भारताचा एकदिवसीय संघ
ऋतुराज गायकवाड, साई सुदर्शन, तिलक वर्मा, रजत पाटीदार, रिंकू सिंह, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर/कर्णधार), संजू सॅमसन (विकेटकीपर), अक्षर पटेल, वॉशिंगटन सुंदर, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल , मुकेश कुमार, आवेश खान, अर्शदीप सिंह, दीपक चाहर. 

दक्षिण आफ्रिका दौऱ्यात भारताचा कसोटी संघ
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, यशस्वी जायसवाल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, ऋतुराज गायकवाड, ईशान किशन (विकेटकीपर), केएल राहुल (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकुर, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), प्रसिद्ध कृष्णा. 

भारताचा दक्षिण आफ्रिका दौऱ्याचं वेळापत्रक

10 डिसेंबर -  पहिला टी20 सामना, डरबन 
12 डिसेंबर, दूसरा टी20 सामना, पोर्ट एलिजाबेथ 
14 डिसेंबर, तीसरा टी20 सामना, जोहानसबर्ग 
17 डिसेंबर, पहला वनडे सामना, जोहानसबर्ग 
19 डिसेंबर, दूसरा वनडे सामना, पोर्ट एलिजाबेथ 
21 डिसेंबर, तीसरा वनडे सामना, पार्ल 
26 ते 30 डिसेंबर, पहिला कसोटी सामना, सेंचुरियन 
3 ते 7 जानेवारी, दूसरा कसोटी सामना, जोहानसबर्ग